भंडारा - जिल्ह्यात बर्डफ्लूची अजून एकही नोंद झाली नाही. तरी बर्ड फ्लूचा प्रभाव जिल्ह्यातील कुक्कुटपालन व्यवसायावर झाला आहे. कोंबड्यांचे दर अर्ध्या वर आलेले आहेत. 2020 मध्ये कोरोनामुळे कुकुट पालन व्यवसायिकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. जिल्ह्यातील शेकडो पोल्ट्री व्यवसायिकांना कोरोना नंतर दुसऱ्यांदा बर्ड फ्लूमुळे आर्थिक संकटाला समोर जावे लागत आहे.
130 वरून दर 60 ते 70 रुपयांवर-भंडारा जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म मध्ये जवळपास 7 लाखाच्या वर कोंबड्या आहेत. यात बॉयलर, कोक्रेल, देशी कोंबड्यांचा समावेश आहे. बर्ड फ्लूच्या अफवेमुळे 130 रुपये नग विकल्या जाणारी कोंबडे 60 ते 70 रुपये नग विकल्या जात आहे. यामुळे पोल्ट्री व्यावसायिकाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. खर्च कमी करण्यासाठी व्यावसायिक कोंबड्यांना खाद्य कमी टाकत असल्यामुळे कोंबड्या एकमेकांना जखमी करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ज्या पोल्ट्री व्यवसायाला शेतीचा जोडधंदा म्हणून पाहले जायचे तोच जोडधंदा नुकसानीत जात असल्यामुळे 'तेलही गेलं तूपही गेलं हाती आल धोपाटणा, अशी स्थिती व्यावसायिकांची झाली आहे.
शासनाने खाद्यपदार्थांसाठी सवलत द्यावी-सध्या दर घसरल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय कोंबड्यांची विक्री करू इच्छित नाही. मात्र जास्त काळ या कोंबड्यांना पोहोचणे म्हणजे आर्थिक खर्च वाढविण्याचा प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. बर्ड फ्लूचा प्रभाव कमी होईपर्यंत पक्षांना टिकविण्यासाठी पुरेसा खाद्य शासनाने कमी दरात कुकूटपालन व्यवसायांना द्यावे, अशी विनंती कुक्कुटपालन व्यावसायिकांनी केली आहे.
बर्ड फ्लू बद्दलच्या अफवा संपवा-बर्ड फ्लू हा पक्षांना होणारा आजार असून बर्ड फ्लूमुळे मानवाचे मृत्यू झाले, अशी नोंद अजून झाली नाही. आपण 100 डिग्री सेल्सिअस तापमानावर अन्न शिजवून खातो. त्यामुळे बर्ड फ्लू मुळे मांसाहार खाणे बंद करा, अशा अफवांना शासनाने थांबविण्याचे काम करावे, अशी मागणी यावेळेस व्यावसायिकांनी केली आहे.
लागोपाठ दुसऱ्या वर्षी व्यवसाय तोट्यात-भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर नागरिकांनी मांसाहार करणे बंद केले होते. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायिकांनी मोठ्या प्रमाणात कोंबड्या जिवंत गाडल्या होत्या. त्यामुळे बरेच कुक्कुटपालन व्यवसायिक पूर्णपणे आर्थिक संकटात गेले. काही लोकांनी पुन्हा हिम्मत करून हा व्यवसाय नव्याने सुरू केला. मात्र आता बर्ड फ्लू मुळे पुन्हा कुक्कुटपालन व्यवसाय आर्थिक संकटात सापडलेला आहे.
हेही वाचा- मे ते जून महिन्यामध्ये मेट्रो-2 अ आणि मेट्रो-7 मार्ग सेवेत - मुख्यमंत्री
हेही वाचा- आपल्यावर आफत येऊ नये यासाठी भाजप नेत्यांकडून अण्णा हजारेंची मनधरणी...!