ETV Bharat / state

भंडाऱ्यात माजी सैनिकांचा कुटुंबीयांसह सत्कार - सभागृह

भंडारा येथील सत्कार समारंभात माजी सैनिकांसाठी सभागृह बांधण्यासाठी २० लाख रूपये देण्याची घोषणा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केली.

सत्कार समारंभावेळी
author img

By

Published : Aug 11, 2019, 8:09 AM IST

भंडारा - माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा काल (शनिवारी) भंडारा येथे सत्कार समारंभ ठेवण्यात आला होता. तुमसरचे आमदार चरण वाघमारे यांच्यातर्फे हा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिकांसाठी सभागृह बांधण्यासाठी २० लाख रूपये देण्याची घोषणा पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केली.

भंडाऱ्यात माजी सैनिकांचा कुटुंबियांसह सत्कार

जिल्ह्याच्या मुख्यालयी माजी सैनिकांच्या सभागृहासाठी २० लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन जागा निश्चित करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरु होणाऱ्या बीपीसीएल प्रकल्पात विरपत्नीसाठी १० टक्के जागा उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.

विजयश्री चॅरिटेबल ट्रस्ट व एक्स सर्व्हिसमेन वारिअर्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित माजी सैनिकांच्या मेळावा साखरकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनिल मेंढे होते. आ. चरण वाघमारे, बाळा काशिवार, अॅड. रामचंद्र अवसरे, पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मुकेश साकूरे, गिऱ्हेपुंजे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे म्हणाले, की देशातील सर्व समस्यांच्या ठिकाणी निवारणासाठी सैनिक अग्रेसर असतात. ९ ऑगस्ट क्रांती दिन व १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन यामध्ये माजी सैनिकांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करुन सुवर्णमध्य साधला. त्यामुळे माजी सैनिकांच्या समस्या व प्रश्नांना सोडविण्यास मदत होणार आहे. विधान सभेच्या सदस्यांच्या मागणीनुसार माजी सैनिकांसाठी १ कोटी रुपये अनुदान सरकारतर्फे मंजूर करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.

पवनी येथे वीरमरण पत्करलेले प्रफुल्ल मोहरकर यांच्या स्मारकासाठी १० लाखांचा निधी देण्यात आला होता. हा निधी अपूरा असल्यामुळे सरकारतर्फे ६० लाखाचा निधी मंजूर करण्यात आल्याचे आमदार अवसरे यांनी सांगितले.

माजी सैनिकांची प्रश्न शासन दरबारी कसोशीने मांडून ते सोडविण्याचे आश्वासन आमदार बाळा काशिवार यांनी दिले. सैनिकांचा अवमान होणार नाही हे नागरिकांनी आपल्या कृतीतून दाखवावे. जिल्ह्यातील सैनिकांच्या समस्या पालकमंत्र्यांनी प्राधान्याने सोडवाव्यात व सैनिकांचा मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी त्यांनी केली.

देशाचा विकास व सुरक्षा सैनिकांमुळेच होतो. जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सभागृहासाठी आमदार निधीतून मदत देवू, असे आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले. सरकार आणि सैनिक यांच्या मधील दूवा लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांच्या समस्या नक्कीच सोडवू असे ते म्हणाले.

माजी सैनिकांच्या समस्या व प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येईल. तसेच सैनिकांकडून विद्यार्थ्यांनी शिस्तीचा वारसा घ्यावा व सैनिकांचा सन्मान ठेवावा, असे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करुन उपस्थितांचे मनोरजंन केले. वीर जवान प्रफुल्ल मोहरकर यांचे वडिल तसेच माजी सैनिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, त्यांचे पाल्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Intro:Anc : माजी सैनिकांचा आणि त्यांच्या परिवाराचा शनिवारी भंडारा येथे सत्कार समारंभ ठेवण्यात आले, तुमसर क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे यांच्या तर्फे हा सत्कार ठेवण्यात आले होते, या मध्ये पालकमंत्री सह खासदार आणि आमदार यांचा ही समावेश होता, माजी सैनिकांसाठी सभागृह बांधण्यासाठी 20 लाख रुपये देण्याची घोषणा यावेळी पालकमंत्री यांनी केली. Body:जिल्हयाच्या मुख्यालयी माजी सैनिकांच्या सभागृहासाठी 20 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार असून लवकरच जिल्हाधिकारी यांच्या सोबत बैठक घेऊन जागा निश्चित करण्यात येणार आहे. जिल्हयात सुरु होणाऱ्या बीपीसीएल प्रकल्पात विरपत्नीसाठी 10 टक्के जागा उपलब्ध करुन देण्यात येतील, तसेच माजी सैनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याबाबत शासनस्तरावर निश्चित प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी केले.
विजयश्री चॅरिटेबल ट्रस्ट व एक्स सर्विसमेन वारिअर्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित माजी सैनिकांच्या मेळावा साखरकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार सुनिल मेंढे होते. आमदार चरण वाघमारे, बाळा काशिवार, ॲड. रामचंद्र अवसरे, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष मुकेश साकूरे, गिऱ्हेपुंजे, उपस्थित होते
पालकमंत्री पुढे म्हणाले की, देशातील सर्व समस्यांच्या ठिकाणी निवारणासाठी सैनिक अग्रेसर असतात. 9 ऑगस्ट क्रांती दिन व 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिन यामध्ये माजी सैनिकांचा सत्कार सोहळयाचे आयोजन करुन सुवर्णमध्य साधला. त्यामुळे माजी सैनिकांच्या समस्या व प्रश्नांना सोडविण्यास मदत होणार आहे. विधान सभेच्या सदस्यांच्या मागणीनुसार माजी सैनिकांसाठी 1 कोटी रुपये अनुदान शासनातर्फे मंजूर करण्यात आले आहेत, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात खासदार सुनिल मेंढे म्हणाले की, माजी सैनिकांचे प्रश्न महत्वाचे असून ते सोडविण्याकरीता प्रधान्य देण्यात येईल. भारताला विरांची परंपरा लाभली आहे. सैनिकांसाठी असणाऱ्या समस्या नक्की सोडविण्याचे सागून पवनी येथे शहिद प्रफुल्ल मोहरकर यांच्या स्मारकासाठी 10 लाखाचा निधी देण्यात आला आहे. निधी अपूरा असल्यामुळे शासनातर्फे 60 लाखाचा निधी मंजुर करण्यात आल्याचे आमदार अवसरे यांनी सांगितले.
माजी सैनिकांची प्रश्न शासन दरबारी कसोशीने मांडून ते सोडविण्याचे आश्वासन आमदार बाळा काशिवार यांनी दिले. सैनिकांचा अवमान होणार नाही हे नागरिकांनी आपल्या कृतीतून दाखवावे. जिल्हयातील सैनिकांच्या समस्या पालकमंत्र्यांनी प्राधान्याने सोडवाव्यात व सैनिकांचा मालमत्ता कर माफ करावा, अशी मागणी त्यांनी केली. देशाचा विकास व सुरक्षा सैनिकामुळेच होतो. जिल्हयात बांधण्यात येणाऱ्या सैनिकांच्या सभागृहासाठी आमदार निधीतून मदत देवू, असे आमदार चरण वाघमारे यांनी सांगितले. सरकार आणि सैनिक यांच्या मधील दूवा लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे त्यांच्या समस्या नक्कीच सोडवू असे ते म्हणाले.
माजी सैनिकांच्या समस्या व प्रश्न प्राधान्याने सोडविण्याचे प्रयत्न करण्यात येईल. तसेच सैनिकांकडून विद्यार्थ्यांनी शिस्तीचा वारसा घ्यावा व सैनिकांचा सन्मान ठेवावा, असे जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी सांगितले. शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य सादर करुन उपस्थितांचे मनोरजंन केले. शहीद प्रफुल्ल मोहरकर यांचे वडिल तसेच माजी सैनिकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हयातील माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता, त्यांचे पाल्य मोठया संख्येने उपस्थित होते. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.