ETV Bharat / state

भंडारा जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव, आरोग्य विभागाचा कर्मचारी संक्रमित - bhandara corona new cases news

बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कार्यरत एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही वार्ता कळताच जिल्हा परिषदेत एकच गोंधळ उडाला, त्याला ऑफिसमधूनच कोरोना उपचारसाठी नेण्यात आले. यानंतर संपूर्ण जिल्हा परिषद बाहेरील लोकांसाठी बंद करण्यात आली. नंतर, आरोग्य विभागासह संपूर्ण इमारतीला सॅनिटाईझ केले गेले. सॅनिटाईझ झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना लवकर सुट्टी देऊन पाठविण्यात आले.

भंडारा जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव
भंडारा जिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव
author img

By

Published : Jul 15, 2020, 7:03 PM IST

भंडारा : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती समोर येताच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांचा घशाचा नमुना तपासणीसाठी पाठविला असतांनाही तो आज आपल्या कार्यालयात आलाच कसा, असा प्रश्न दिवसभर चर्चेला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ऑफिसमधूनच त्याला कोरोना सेंटरमध्ये पुढील उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर, जिल्हा परिषद रविवारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागात कार्यरत एका कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही वार्ता कळताच जिल्हा परिषदेत एकच गोंधळ उडाला. या कर्मचाऱ्याकडे साकोली तालुक्यातील जबाबदारी देण्यात आली होती. त्यामुळे बरेचदा तो भंडाऱ्यावरून कामानिमित्त साकोली येथे जात होता. मात्र, बुधवारी तो भंडारा जिल्हा परिषद येथील त्याच्या आरोग्य विभागाच्या ऑफिसमध्ये कामावर आला होता. परंतु, आधीच त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. तर, बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह येताच त्याला ऑफिसमधूनच कोरोना उपचारसाठी नेण्यात आले. यानंतर संपूर्ण जिल्हा परिषद ही बाहेरील लोकांसाठी बंद करण्यात आली. तर, कर्मचाऱ्याना त्यांच्या ऑफिसमध्येच राहण्याचे आदेश दिले गेले.

दरम्यान, नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना बोलवून संपूर्ण परिसरात आणि आरोग्य विभागासह संपूर्ण इमारतीला सॅनिटाईझ केले गेले. सॅनिटाईझ झाल्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांना लवकर सुट्टी देऊन पाठविण्यात आले. मात्र, आरोग्य विभागात दाखल झाल्यानंतर त्याचा विभागातील ज्या-ज्या कर्मचाऱ्यांशी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्क आला होता. त्या कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात ठेवून त्यांची आरोग्य तपासणी न करता त्यांना त्यांच्या घरी पाठविणे म्हणजे त्यांच्या कुटुंबाला धोक्यात घालण्याचे काम आहे. दरम्यान, शासनाने 30 टक्के कर्मचाऱ्यांना बोलावून कामे करावी असे आदेश काढले असतांनाही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी 100 टक्के कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले आहे. कर्मचाऱ्यांचा मुख्याधिकारी यांच्या निर्णयाला विरोध आहे. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची सवय आहे. त्यामुळे यावर कोणीही पुढे येऊन बोलण्याची हिम्मत करीत नाही, अशी माहिती येथील कर्मचाऱ्यांनी दिली आहे.

तर, कोरोनाबाधित कर्मचारी मिळाल्यानंतर जिल्हा परिषद रविवारपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेली आहे. यादरम्यान परिस्थितीचा आढावा घेऊन सोमवारी जिल्हा परिषद सुरू करायची की बंद ठेवायची याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.