भंडारा - जिल्ह्याच्या गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका डॉक्टराचे विकृत ( Gobarwahi Primary Health Center Doctor beat peon ) रूप पाहायला मिळाले. डॉक्टरने या आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या शिपायाला अतिशय निर्दयीपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मारहाण नेमकी कशासाठी केली गेली? हे मात्र समजू शकले नाही. ही घटना 22 तारखेला घडली. काल रात्रीला गोबरवाही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली.
हेही वाचा - एमआयएमचा प्रस्ताव सध्या तरी काँग्रेसला मिळाला नाही, प्रस्ताव आल्यावर विचार करू - नाना पटोले
जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सागर कडस्कार यांनी त्याच आरोग्य केंद्रात कार्य करणाऱ्या शिपायाला सुरवातीला एका काठीने मारायला सुरुवात केली. त्यानंतर या डॉक्टरने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. नारायन उइके असे शिपायाचे नाव आहे.
मारहाण करण्याचे कारण अद्याप स्पष्ठ नसले, तरी ज्या प्रकारे डॉक्टर आपल्या कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण करत आहे ते बघता या मारहाण करणाऱ्या डॉक्टरला जीवन देणारा देव म्हणाव की सैतान हा प्रश्न उपस्थित होत आहे. या संबंधी डॉक्टरशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र, जिल्हा आरोग्य अधिकारी मिलिंद सोमकुवर यांना विचारले असता मला या घटनेविषयी काही माहिती नाही. चौकशी केल्यावर सांगतो, असे त्यांनी उत्तर दिले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून आदिवासी संघटना डॉक्टर विरोधात एकवटल्या आहेत.