ETV Bharat / state

भंडारा; कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट; नागरिकांना दिलासा - भंडारा कोरोना लेटेस्ट न्यूज

कोरोना तपासणीचे कॅम्प संपूर्ण जिल्ह्याभर लावण्यात आले आहेत. नागरिकांसाठी बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था केली. याचा फायदा जिल्ह्यात होताना दिसत आहे.

Decrease corona patients number in bhadara
author img

By

Published : May 16, 2021, 8:01 PM IST

भंडारा - जिल्ह्यासाठी 16 मे हा दिवस समाधानकारक निघाला असून आज (रविवार) तब्बल दोन महिन्यानंतर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दोन अंकावर आलेला आहे. 16 मार्चला भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या 72 होती त्यानंतर रुग्ण संख्या तीन अंकी आणि चार अंकी आकड्यावर पोहचली होती. जिल्हा लवकर कोरोनामुक्त व्हावा, अशी आशा नागरिक करीत आहेत.

12 एप्रिलला रुग्ण संख्या 1596 वर
9 फेब्रुवारीला भंडारा जिल्ह्यांमध्ये केवळ 3 कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यामुळे भंडारा जिल्हा लवकरच पूर्ण कोरोनामुक्त होईल अशी आशा व्यक्त केली जात होती. मात्र, कोरोनाने पलटवार केला आणि ही संख्या झपाट्याने वाढत 12 एप्रिलला 1हजार 596च्या घरात पोहोचली. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती. तर नागरिकांच्या मनात भितीचे वातावरण पसरले होते. ही रुग्ण संख्या अजून किती वाढते आणि किती लोकांचा जीव घेते, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली होती.

ब्रेक द चैनचा फायदा
शासनाने वाढत्या कोरोना रुग्णांची संख्येवर आळा घालण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत महाराष्ट्रात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. भंडारा जिल्ह्यात संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात आली. कोरोना तपासणीचे कॅम्प संपूर्ण जिल्ह्याभर लावण्यात आले आहेत. नागरिकांसाठी बेड आणि ऑक्सिजनची व्यवस्था केली. याचा फायदा जिल्ह्यात होताना दिसत आहे.

सध्या जिल्ह्यात केवळ 2291 क्रियाशील रुग्ण
जिल्ह्यात आज 516 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांची संख्या 53 हजार 261 झाली असून आज 96 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 57 हजार 272 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के आहे. जिल्ह्यातील क्रियाशील रुग्णाची संख्या 2मेला 11 हजारच्या घरात पोहचली होती. जी सध्या कमी होऊन 2 हजार 291 एवढे क्रियाशील रुग्ण सध्या जिल्ह्यात आहेत.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 40, मोहाडी 02, तुमसर 09, पवनी 12, लाखनी 05, साकोली 25 व लाखांदूर तालुक्यातील 03 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 53 हजार 261 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. आज कोरोनाच्या 04 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1 हजार 20 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्यूदर 01.78 टक्के एवढा आहे. रुग्ण संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी गाफील राहू नये. नागरिकांनी नियमाचे पालन करावे, मास्क वापरावा आणि हात स्वच्छ धुऊन सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.