ETV Bharat / state

दिलासादायक! भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट - भंडारा कोरोना रुग्णसंख्येत घट

शासनाच्या नियमाप्रमाणे भंडारा जिल्हा पहिल्या टप्प्यात आला आणि जिल्ह्या पूर्णपणे अनलॉक झाला आहे. रविवारी भंडारा जिल्ह्यात 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर 101 कोरोना मुक्त झालेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 81% आहे. सक्रिय रुग्ण सध्या 244 याची टक्केवारी 0.41% आहे. मृत्युदर हा 1.78 टक्के आहे. तर पॉझिटिव्ह रेट हा 1. 59 टक्के आहे.

कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट
कोरोनाबाधित रुग्णसंख्येत घट
author img

By

Published : Jun 13, 2021, 5:21 PM IST

भंडारा - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट झाली असल्याने जिल्हा पहिल्या टप्प्यात आला आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या नवीन आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व दुकाने सर्वच दिवशी सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. 7 जूनला भंडारा जिल्ह्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा दर 7. 43 टक्के होता, तो कमी होऊन 13 जून जूनला 1. 59 टक्के एवढा झाला आहे. जिल्हा अनलॉक झाला असला तरी जिल्ह्यातील जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहणार आहे.

काय सुरू आणि किती वाजेपर्यंत

शासनाच्या नियमानुसार जिल्हा हा पहिला टप्प्यात आला असल्याने जिल्हाधिकारी यांनी 13 जूनला काढलेल्या आदेशानुसार भंडारा जिल्ह्यातील सर्वच दुकाने रविवार ते शनिवार सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. तसेच चित्रपटगृहे सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. उपहारगृह, हॉटेल, खानावळ हे सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहतील. सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, उद्याने, बगीचे, मैदाने हे सकाळी 5 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. खेळ, व्यायाम शाळा सकाळी 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 5 ते 9 पर्यंत सुरू राहतील. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम सभागृह/ परिसराच्या क्षमतेच्या 50% किंवा 100 व्यक्ती यामध्ये असलेले कमाल मर्यादेत सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान सुरू राहतील. विवाह सोहळ्यासाठी सभागृह/ परिसराच्या क्षमतेच्या 50% किंवा 100 व्यक्ती यामध्ये जे कमी असेल त्या मर्यादेत सकाळी 7 ते सायंकाळी 7 पर्यंत सुरू राहतील. बांधकामांना पूर्णपणे मुभा राहील. शासकीय आणि खाजगी आस्थापने 100% क्षमतेने सकाळी 7 ते सायंकाळी 7 दरम्यान सुरू राहतील. अंत्यविधीसाठी 50 लोकांची मर्यादा ठरवली गेली आहे. केशकर्तनालय, ब्यूटी पार्लर, स्पा सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्याय 50% क्षमतेनुसार केवळ वेळ घेऊन आलेल्या ग्राहकांना सेवा देण्याच्या अटीवर सुरू राहतील. सार्वजनिक बस परिवहन पूर्णक्षमतेने सुरू राहण्याची मुभा असेल मात्र उभे प्रवासी वाहतूक करण्यास मनाई आहे. उत्पादन क्षेत्र पूर्ण वेळ सुरू राहील. आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक नियमित पूर्णवेळ सुरू राहील. केवळ लेवेल 5 वर्ग वरील समाविष्ट भागातून प्रवासी येत असल्यास त्यांना ई-पास अनिवार्य राहील. या दरम्यान मास्क, सॅनिटायझर व सामाजिक अंतर या त्रिसूत्रीचे पालन करणे अनिवार्य असेल. जिल्हा संपूर्ण अनलॉक झाला असला तरी जिल्ह्यातील जमावबंदी सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत आणि संचारबंदी रात्री 11 ते 6 सहा वाजेपर्यंत सुरू राहील.

आज 17 जण कोरोनाबाधित, तर 101 कोरोनामुक्त

महाराष्ट्र शासनाने 7 जून पासून महाराष्ट्रात टप्प्याटप्प्याने अनलॉक सुरू केला आहे. 7 जूनला भंडारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा दर 7.42 असल्याने भंडारा जिल्हा तिसऱ्या टप्प्यात होता. त्यामुळे जिल्ह्याला अंशत: लॉकडाऊन सुरू होते. मात्र त्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाटाने घट होत गेली आणि 13 जूनपर्यंत कोरोनाबाधित रुग्णांचा दर हा 1.1 59 टक्क्यावर आला. त्यामुळे शासनाच्या नियमाप्रमाणे भंडारा जिल्हा पहिल्या टप्प्यात आला आणि जिल्ह्या पूर्णपणे अनलॉक झाला आहे. रविवारी भंडारा जिल्ह्यात 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, तर 101 कोरोनामुक्त झालेत. जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 81% आहे. सक्रिय रुग्ण सध्या 244 याची टक्केवारी 0.41% आहे. मृत्युदर हा 1.78 टक्के आहे. तर पॉझिटिव्ह रेट हा 1. 59 टक्के आहे.

हेही वाचा -राज्यातील कोरोना परिस्थितीचे अपडेट्स; वाचा एका क्लिकवर..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.