ETV Bharat / state

पाहुनी गावात माकडांचा हैदोस; पळसबाग व वेलवर्गीय पिकांवर माकडांचा ताव

शेतमाल, पळसबाग व वेलवर्गीय पिकांवर माकडाचे कळप ताव मारत असल्याने शिवाय गावातील 50 ते 60 घरांचेही माकडांनी नुकसान केल्याने पाहुनी गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वनविभागाला या उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी पाहुनीवासीय करत आहेत.

भंडारा
भंडारा
author img

By

Published : Nov 8, 2020, 10:09 PM IST

भंडारा - जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील पाहुनी गावात माकडांनी हैदोस मांडला आहे. शेतमाल, पळसबाग व वेलवर्गीय पिकांवर माकडाचे कळप ताव मारत असल्याने शिवाय गावातील 50 ते 60 घरांचेही माकडांनी नुकसान केल्याने पाहुनी गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. वनविभागाला या उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी पाहुनीवासीय करत आहेत. मात्र, अजूनही त्यांचा बंदोबस्त झालेला नाही.

पळसबाग व वेलवर्गीय पिकांवर माकडांचा ताव

1 महिन्यापासून माकडांचा हैदोस सुरू
जंगलात अन्न मिळत नसल्याने माकडे गावाच्या दिशेने येतात. मात्र, कधीही आठ दिवसांच्या वर एका ठिकाणी थांबत नसल्याचे आत्तापर्यंत दिसून आले आहे. मात्र, पाहुनी गावात मागील एक महिन्यापासून या माकडांनी ठिय्या मांडला आहे. 25 ते 30 माकडांचा कळप गावात आणि शेतात वास्तव करीत आहे. कधी कवलांच्या घरावर तर कधी शेतातील भात, मिरची, फळवर्गीय झाडांवर उड्या मारून पेरू, पपई, यांची नासाडी करत आहेत. गावातील आतापर्यंत 50 ते 60 कवलारू घरांचे नुकसान झाले आहे. काही गावकऱ्यांनी सुरुवातीला कवले नव्याने बसविली. मात्र, माकडे सतत कवले फोडत असल्याने आता गावकऱ्यांनी घरांची कवले तशाच परिस्थिती ठेवले असून कवले अंगावर पडल्याने जखमी होण्याचे प्रकार देखील वाढत आहेत.
वन विभागाला विनंती मात्र अजून नियंत्रण नाही
मागील महिन्याभरापासून गावकरी त्रस्त आहेत. माकडाचे कळप दिवसा आणि रात्रीही धुमाकूळ घालत आहेत. शेतातील आणि घरावरील वेलवर्गीय काकडी, दोडका, कारली, वाल या पिकांचे नुकसान करत आहेत. तर शेतातील उभे भात पीक उपटून नष्ट करीत आहेत. आधीच मावा तुडतुडा सारख्या रोगाने हैराण झालेला शेतकरी माकडांच्या हैदोसाने पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे ह्या उपद्रवी माकडांचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी पाहुनीवासीय करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.