ETV Bharat / state

Corona impact on Family : कोरोनामुळे पतीच्या मृत्यूनंतर 'ती' जगतेय निखाऱ्यावरचे जीवन

कोरोना महामारीत ( Maharashtra Corona Updates ) बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला त्यातही बऱ्याच कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला जगण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी संघर्ष करावा लागत ( Corona Impact on Family ) आहे. भंडारा शहरातील अशीच एक स्त्रीचे जीवन पतीच्या अकाली मृत्यूनंतर विस्तवातील निखाऱ्या सारखा झाला आहे. विशेष म्हणजे याच विस्तवाच्या निखार्‍यातून तिला जगण्याची नवी उमेद ही मिळाली आहे.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Feb 5, 2022, 10:17 PM IST

Updated : Feb 9, 2022, 3:44 PM IST

भंडारा - कोरोना महामारीत बऱ्याच लोकांचा मृत्यू झाला त्यातही बऱ्याच कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीला जगण्यासाठी आणि कुटुंबाचा गाडा ओढण्यासाठी संघर्ष करावा लागत ( Corona Impact on Family ) आहे. भंडारा शहरातील अशीच एक स्त्रीचे जीवन पतीच्या अकाली मृत्यूनंतर विस्तवातील निखाऱ्या सारखा झाला आहे. विशेष म्हणजे याच विस्तवाच्या निखार्‍यातून तिला जगण्याची नवी उमेद ही मिळाली आहे.

'ती' जगतेय निखाऱ्यावरचे जीवन

दुसऱ्या लाटेत झाला मृत्यू - दुसऱ्या लाटेत 27 एप्रिल, 2021 मध्ये भंडारा शहरातील रवी क्षीरसागर या 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे अवघ्या आठ दिवसांतच मृत्यू झाला. रवीच्या मृत्यूमुळे त्याची पत्नी आणि दोन मुलांवर जणू आभाळच कोसळले. कारण रवी हा घरचा कर्ता पुरुष होता.

पत्नीने ही केला होता आत्महत्या करण्याचा विचार - रवीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी अनिता या एकट्या पडल्या. दोन मुलांचे शिक्षण कसे पूर्ण करावे, पैसे कोठून आणावे, जगावे कसे, असे बरेच प्रश्न अनिता यांच्या समोर निर्माण झाले. त्यामुळे त्यांच्या मनात आत्महत्येचा विचार अनेकवेळा आले. मात्र, आपल्यानंतर मुलांचे काय या विचाराने त्यांना जगण्यासाठी नवी उमेद मिळाली.

कपडे इस्त्री करून उदरनिर्वाह करण्याचा घेतला निर्णय - रवी क्षीरसागर हे भंडारा शहरातील गांधी चौकात एका ठिकाणी कपडे इस्त्री करण्याचा काम करत होते. त्यांच्या मृत्यूनंतर अनिता यांनीही हेच काम करून उदरनिर्वाह करण्याचे ठरविले. मात्र, या कधीही त्यांना हातात इस्त्री घेतली नव्हती. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी दिराकडून हा काम शिकून घेतला.

आता दिवसभर तारेवरची कसरत - अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर बहिणाबाईंच्या कवितेतील ही ओळ सध्या अनिता त्यांच्या आयुष्यात जगत आहे. इस्त्री करुन उदरनिर्वाह करण्यासाठी अनिता यांची तारेवरची कसरत होत आहे. कारण घरातील सर्व काम करुन दहा वाजता दुकान सुरू करणे, त्यानंतर कोळशाच्या इस्त्रीने एकाच जागेवर उभे राहून कपडे इस्त्री करणे. सायंकाळी घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करणे, मुलांचा अभ्यास घेणे या सर्व जबाबदाऱ्या त्या सध्या पार पाडत आहेत.

माझ्यावर आलेली परिस्थिती इतरांवर येऊ नये - कोरोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना शासनातर्फे 50 हजार रुपये मदत मिळणार आहे. यासाठी अनिता यांनीही अर्ज केला आहे. मात्र, अद्याप तरी त्यांना कोणताच मोबदला मिळाला नाही. पतीच्या अचानक जाण्याने कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी अचानक आली. त्यामुळे पतीऐवजी मी गेले असते तरी बरे झाले असते, असे अनिता नेहमीच बोलून दाखवतात. माझ्यावर आलेली परिस्थिती इतर कोणावरही येऊन नये, अशी प्रार्थना अनिता करत आहेत.

हेही वाचा - Rudra Tiger Death Case: रुद्र वाघाच्या मृत्यूप्रकरणी 24 तासात शिकाऱ्याला अटक, तीन आरोपी फरार

Last Updated : Feb 9, 2022, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.