ETV Bharat / state

भंडारामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची पदयात्रा काढून कोरोनाबाबत जनजागृती - फूट मार्च बातमी

कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वतः पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्यासह फूट मार्च काढून नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. या फूट मार्चचा फायदा होऊन जिल्ह्यातील जास्त लोकांनी कोरोनाचे नियम पाळण्यास सुरुवात केली आहे.

फूड मार्चद्वारे जनजागृती
फूड मार्चद्वारे जनजागृती
author img

By

Published : Apr 7, 2021, 11:23 AM IST

भंडारा - कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे भंडारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी मागील आठवडाभरापासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात स्वतः पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्यासह पदयात्रा काढून नागरिकांमध्ये जनजागृती करीत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानंतर जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळण्यास सुरुवात केली आहे.

नियमांचे पालन
नागरिक नियम पाळत नसल्याने सुरू केले फुट मार्च...

मार्च महिन्यापासून भंडारा जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णाच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू,असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते. त्यानंतरही नागरिक या आदेशाकडे दुर्लक्ष करून कोरोनाच्या त्रिसूत्री नियमाचे पालन करीत नसल्याने बऱ्याच लोकांवर विनामास्क कारवाई सुद्धा करण्यात आली. नागरिकांवर कोणत्याच गोष्टींचा परिणाम होताना दिसत नसल्याने जिल्हाधिकारी संदीप कदम हे स्वतः जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांच्यासह भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन मुख्य मार्गावरून पदयात्रा काढत आहेत.

भंडाऱ्यात फूट मार्च
भंडाऱ्यात फूट मार्च

हेही वाचा - नैतिकतेची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीचीच आहे का?'

भंडारा शहरात काढला फूट मार्च....

भंडारा जिल्ह्याच्या इतर तालुक्यांमध्ये पदयात्रा काढल्यानंतर जिल्हाधिकारी संदीप कदम आणि पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी आज भंडारा शहरात पदयात्रा काढली. भंडारा पोलीस स्टेशन पासून पोलीस दलाचे शिपाई, नगरपालिकेचे कर्मचारी, यांच्यासह ही पदयात्रा काढण्यात आली. गांधी चौक, पोस्ट ऑफिस चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, राजीव गांधी चौक या सर्व ठिकाणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे स्वतः पायी चालत नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्यास सांगत होते. विनामास्क फिरणाऱ्या आणि आठनंतर संचारबंदीच्या काळात काम नसताना निघणाऱ्या लोकांवर दंडात्मक कार्यवाही केली जात होती. मी स्वतः आणि पोलीस अधीक्षक पायी रस्त्यावर फिरत असल्याने नागरिकांवर त्याचा नक्कीच प्रभाव दिसून येत आहे. प्रत्येक तालुक्यात नागरिक तोंडावर मास्क लावून सोशल डिस्टंन्सिंगचे जास्तीत जास्त पालन करताना दिसून येत आहेत असे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी सांगितले.

हेही वाचा - विमान प्रवाशांनी कोरोना नियम मोडल्यास कठोर कारवाई; मुंबई पालिकेची सुधारित नियमावली

मंगळवारीही कोरोनाच्या रुग्णांचा नवा उच्चांक...

मंगळवारी भंडारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने पुन्हा एक नवीन उच्चांक प्रस्थापित केलेला आहे. मंगळवारी भंडारा जिल्ह्यात 868 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 199 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या जिल्ह्यात 6004 क्रियाशील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. तसेच आज आठ लोकांचा कोरोना मुळे मृत्यू झालेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.