ETV Bharat / state

शासकीय मानधन मिळवून देण्याच्या नावावर लोककलाकारांकडून लाच घेणाऱ्या लिपिकाला अटक

author img

By

Published : Dec 13, 2019, 9:53 PM IST

Updated : Dec 13, 2019, 11:12 PM IST

भंडाऱ्याच्या समाजकल्याण विभागातील लिपिकाला लाच घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. अभय मोतीराम पशिने, असे या लाचखोर लिपिकाचे नाव असून त्याने शासनाच्या योजनेअंतर्गत मानधन मिळवून देण्याच्या नावावर वृद्ध लोककलाकारांकडून 5 हजार रुपयांची लाच घेतल्याची माहीती आहे.

Clerk arrested for taking bribe from artist
शासकीय मानधन मिळवून देण्याच्या नावावर लोककलाकाराकडुन लाच घेणाऱ्या लिपिकाला अटक

भंडारा - शासनाच्या योजनेअंतर्गत मानधन मिळवून देण्याच्या नावावर वृद्ध लोककलाकारांकडून लाच घेणाऱ्या समाजकल्याण विभागातील लिपिकाला अटक करण्यात आली आहे. भंडारा लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली. अभय मोतीराम पशिने वय (53), असे लाचखोर लिपिकाचे नाव आहे.

हेही वाचा - कडकनाथ कोंबडी घोटाळा : शेतकऱ्यांचे आझाद मैदानात आंदोलन, आरोपींची संपत्ती विकून नुकसान भरपाईची मागणी

मोहाडी तालुक्यातील हरदोली गावात राहणारे वृद्ध कलाकार एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षकाचे काम करतात. गेल्या ४० वर्षांपासून हार्मोनियम वादक, भजनकार, गायक, नाटक कलाकार म्हणून स्थानिक पातळीवर ते काम करीत होते. लोक कलाकारांना शासनातर्फे मानधन मिळते, अशी माहिती त्यांना मिळाली होती. या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे अर्ज केला. दरम्यान, 1 मार्चला कला तपासणी कार्यक्रमासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवनात त्यांनी मुलाखती दिली. यानंतर समाजकल्याण विभागातील लिपिक अभय पशिनेनी त्यांना भेटून निवड प्रकियेसाठी मुलाखत घेणाऱ्या कमिटीकडून मार्क वाढवून निवड करून देतो, असे सांगितले. यासाठी ५ हजार रुपयांचा खर्च येईल, असेही सांगितले. याबद्दल त्यांनी भंडारा लाचलुचपत विभागाला तक्रार केली असता शुक्रवारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे सापळा रचून अभय पशिने याला ५ हजार रुपये घेताना रंगेहाथ अटक केली.

Intro:Body:Anc :- वृद्ध लोक कलाकाराला शासनाचे योजने अंतर्गत मानधान मिळवून देतो असे सांगून पाच हजाराची लाच मागणाऱ्या समाजकल्याण विभागातील लिपिकाला भंडारा लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. अभय मोतीराम पशिने वय 53 वर्ष असा अटक केलेल्या लिपिकाचे नाव आहे.
तक्रारदार हा मोहाडी तालुक्यातील हरदोली गावात राहणार वृद्ध कलाकार असून एका खाजगी कंपनीत सिक्युरिटी गार्ड चे काम करीत आहे मागील चाळीस वर्षापासून हार्मोनियम वादक भजन कार गायक नाटक कलाकार म्हणून स्थानिक पातळीवर मनोरंजनाचे काम करीत होता.
लोक कलाकारांना शासनातर्फे मानधन मिळतो अशी माहिती तक्रार कर्त्याला मिळाली या योजनेचा फायदा घेण्यासाठी त्यांनी फेब्रुवारी 19 मध्ये जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अर्ज केला त्या अर्जाच्या अनुषंगाने एक मार्च 2019 ला कलेच्या तपासणी कार्यक्रमाकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवन येथे सकाळी आठ वाजे उपस्थित झाले कलेचा तपासणीसाठी त्यांनी मुलाखाती दिली या मुलाखतीनंतर अभय पशिने हे तक्रारदाराला स्वतःहून भेटले आणि योजनेकरीता निवड करायची असेल तर मी मुलाखत घेणाऱ्या कमिटीकडून तुमचे मार्क वाढवून तुमची निवड करून देतो असे सांगितले यासाठी तुम्हाला पाच हजार रुपयाचे खर्च येईल असेही त्यांनी या वृद्ध लोककला करायला सांगितले.
गरिबीची झेड सुटणाऱ्या या उद्योग कलाकाराकडे पैसे नसल्यामुळे तो शासनाच्या योजनेचा फायदा घेण्यासाठी गेला होता मात्र त्यातही या कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडून पाच हजाराची रक्कम मागतात त्यांनी त्याची तक्रार भंडारा लाचलुचपत विभागाला केली त्यानुसार शुक्रवारी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय भंडारा येथे सापळा रचून अभय पशिने याला पाच हजार रुपये घेताना रंगेहात
पकडून त्याच्याविरुद्ध भंडारा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंद केला तसेच त्याच्या घराची झडती सुरू केली गेली आहे.Conclusion:
Last Updated : Dec 13, 2019, 11:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.