ETV Bharat / state

जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे, भंडारा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Arogya Setu app download bhandara

जिल्ह्यात 98 हजार 670 नागरीक आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करीत आहेत. हे अ‍ॅप मराठी आणि हिंदीसोबत देशातील 11 भाषांमध्ये उपलब्ध असल्याचेही जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.

Bhandara collector pradipchandran
Bhandara collector pradipchandran
author img

By

Published : Jun 14, 2020, 3:02 PM IST

भंडारा - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता केंद्र व राज्य सरकार विविध उपाययोजना राबवित आहे. कोरोनाशी संबंधित माहिती, आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती म्हणजेच कोरोना विषाणूचा जोखीम कितपत आहे यासाठी केंद्र सरकारने आरोग्य सेतू ॲप लाँच केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी केले आहे.

जिल्ह्यात 98 हजार 670 नागरीक आरोग्य सेतू अ‍ॅपचा वापर करीत आहेत. हे अ‍ॅप मराठी आणि हिंदीसोबत देशातील 11 भाषांमध्ये उपलब्ध असल्याचेही जिल्हाधिकारी प्रदीपचंद्रन यांनी सांगितले.

सध्या कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत असून त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचावी आणि सर्वांनी याबाबत सजग राहून त्याविरोधात लढा उभारावा यासाठी हे अ‍ॅप मार्गदर्शन करेल. सर्व भारतीय भाषांमध्ये सदर अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले असून सर्वांना समजेल अशी माहिती त्यावर आहे. आरोग्य सेतू अ‍ॅप ब्लूटूथ आणि जीपीएसचा वापर करतो. जीपीआरद्वारे व्यक्तीचे रिअल टाईम लोकेशन ट्रॅक करण्यात येते. तसेच कोणताही कोरोनाग्रस्त व्यक्ती जवळ आल्यास हे अ‍ॅप त्या व्यक्तीला ट्रॅक करते. 6 फूट अंतरापर्यंत हे अ‍ॅप व्यक्तीला ट्रॅक करू शकतो.

स्वत: चाचणीमध्ये वापरकर्ता अति धोकादायक स्थितीत आढळल्यास या ॲपद्वारे 1075 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करण्याबाबत वापरकर्त्यास या ॲपद्वारे सुचविण्यात येते. कोरोनाविरोधातील लढाईत लोकांना आरोग्य सेवांशी जोडणे हा या अ‍ॅपचा प्रमुख उद्देश आहे. अंगणवाडी, आशा कार्यकर्त्यांसह शालेय शिक्षक आणि आरोग्य खात्यांच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या अ‍ॅपबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे. आयओएस आणि अ‍ॅन्ड्रॉईड फोनवर हे अ‍ॅप डाऊनलोड केले जाऊ शकते.

तसेच, कोरोनाला घाबरू नका, आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करा आणि कोरोनाशी संबंधित माहिती जाणून घ्या. आपल्या आजूबाजूला असलेल्या संक्रमित व्यक्तींची माहिती, तसेच प्रत्येक राज्याचे हेल्प डेस्क नंबर आणि इतर महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मोबाईल फोनमध्ये 'आरोग्य सेतू' अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

आरोग्य सेतू अॅप असा करावा डाऊनलोड:

गुगल प्ले स्टोअर वर जाऊन आरोग्य सेतू सर्च करून हे ॲप डाऊनलोड करता येणार आहे. हे ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरने (एनआयसी) बनवले असून त्यामुळे एनआयसीने जारी केलेले ॲप डाऊनलोड करावे.

...असा वापरावा आरोग्य सेतू अॅप

आयओएस आणि ऍन्ड्रॉईड फोनवर हा अॅप डाऊनलोड करावा. त्यानंतर ब्लूटूथ आणि लोकेशन ऑन करावे. त्यात सेट लोकेशन "ऑलवेज" असे ठेवावे. आपल्याला आवश्‍यक असलेली भाषा त्यावर नमूद केल्यास त्या भाषेमध्ये सर्व माहिती आरोग्यसेतूद्वारे उपलब्ध होते. अ‍ॅपमध्ये असलेल्या प्रश्‍नांची उत्तरे स्पष्टपणे दिल्यास आपल्यामध्ये कोविडच्या आजाराची लक्षणे आहे का? याची माहिती देखिल लगेच मिळते. यासह इतर आजारांविषयी देखिल त्यावर माहिती मिळत असल्याने आरोग्य सेतू अ‍ॅप लोकांच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.