ETV Bharat / state

'सातरा'च्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना मिळतोय रोजगार - Chili pepper

गावाबाहेर शेतामध्ये तात्पुरता मांडव घालून यामध्ये लाल मिरचीचे देठ तोडण्याचे काम जेथे होते त्याला ग्रामीण भागात 'सातरा' असे म्हटले जाते. ज्या लाल मिरचीपासून आपण दूर राहतो त्याच लाल मिरचीचा देठ तोडण्याचा हा रोजगार आहे. लहान मुलांपासून तर वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण येथे मोठ्या आनंदाने काम करतात.

सातरामध्ये काम करताना महिला आणि मुले
author img

By

Published : May 17, 2019, 9:43 PM IST

भंडारा - गावाबाहेर शेतामध्ये तात्पुरता मांडव घालून यामध्ये लाल मिरचीचे देठ तोडण्याचे काम जेथे होते त्याला ग्रामीण भागात 'सातरा' असे म्हटले जाते. 'सातरा' ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवून देणारे एक छत्र बनले आहे. येथे दररोज हजारो लोकांना रोजगार मिळतो. विशेष म्हणजे येथे वेळेचे बंधन नाही आणि तुम्ही केलेल्या कामानुसार पैसे मिळतात. फक्त कामाचा मोबदला हा अपेक्षेपेक्षा कमी आहे. मात्र रोजगार मिळत असल्याने कामगार संतुष्ट आहेत.

उन्हाळ्याच्या काळात हा रोजगार आम्हाला जीवन जगण्यास मदत करतो त्यामुळे आम्ही समाधानी आहोत असे या मजुरांचे मत आहे.

ज्या लाल मिरचीपासून आपण दूर राहतो त्याच लाल मिरचीचा देठ तोडण्याचा हा रोजगार आहे. लहान मुलांपासून तर वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण येथे मोठ्या आनंदाने काम करतात. या सातरामध्ये कोणी एकटा तर कोणी पती-पत्नी तर कुठे संपूर्ण कुटुंब कामाला असते. सध्या शाळांना सुट्टी लागल्यामुळे मुले आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी येतात. तर रोजगार हमीचे आणि शेतीचे काम बंद असल्याने हाताला काम मिळत नसल्याने स्त्री-पुरुष या कामावर येतात. सुरुवातीला या कामाचा त्रास होतो. हाताला जळजळ होणे, खोकला येणे असा त्रास होतो. मात्र कालांतराने याची सवय होऊन नंतर प्रत्येक जण हा काम आवडीने करतो.

एक किलो मिरचीचे देठ तोडून वेगळे करण्याचे दहा रुपये मिळतात. दररोज एक व्यक्ती १५ ते २० किलो मिरचीचे देठ तोडण्याचे काम करतो. यातून दररोज दीडशे ते दोनशे रुपये रोज तो कमवितो कुटुंब असल्यास ६०० ते ७०० रुपये दररोज पूर्ण कुटुंबाची रोजी होते. त्यामुळे हाताला काम मिळाल्याने समाधान आहे, असे येथील मजुर सांगतात. उन्हाळ्याच्या काळात हा रोजगार आम्हाला जीवन जगण्यास मदत करतो त्यामुळे आम्ही समाधानी आहोत असे या मजुरांचे मत आहे.

दरवर्षी दक्षिण भागातून ही मिरची खरेदी करून व्यापारी पवनी तालुक्यात विविध ठिकाणी हे सातरा लावतात, अशा पद्धतीचे ७० ते ८० सातरा संपूर्ण पवनी तालुक्यामध्ये आहेत. या सातराच्या माध्यमातून वीस ते तीस हजार लोकांना दरवर्षी हाताला काम मिळते. नोव्हेंबर ते मे या कालावधीमध्ये हे काम सुरू असते. लाल मिरचीच्या देठ तोडून चांगल्या मिरच्या वेगळ्या केल्या जातात आणि या मिरच्या गरजेनुसार विदेशात आणि देशात पाठविल्या जातात.

Intro:Anc : 'सातरा' ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळवून देणारे एक छत्र, इथे दररोज हजारो लोकांना रोजगार मिळतो, विशेष म्हणजे इथे वेळेचे बंधन नाही आणि पैसे तुम्ही केलेल्या कामा नुसार, फक्त कामाचा मोबदला हा अपेक्षा पेक्षा कमी आहे, मात्र रोजगार मिळत असल्याने कामगार संतुष्ट आहेत.

Body:गावाबाहेर शेतामध्ये तात्पुरता मांडव घालून यामध्ये लाल मिरचीचे डेट तोडण्याचा काम जिथे होतो त्याला ग्रामीण भागात सातरा असे म्हटले जाते.
ऐकून थोडंसं विचित्र वाटल असेल मात्र हे खरे आहे, ज्या लाल मिरची पासून आपण दूर राहतो त्याच लाल मिरचीचा डेट तोडण्याचा हा रोजगार आहे. ही बातमी करण्यासाठी आम्ही या सातऱ्यात शिरलो तेव्हा खोकून खोकून आमचे हाल झाले. शेवटी तोंडाला रुमाल बांधून बातमी साठी लागणारे व्हिडिओ घेतले. व्हिडिओ घेतांना प्रत्येक वेळेस डोक्यात एक प्रश्न निर्माण होत होता, तो म्हणजे इथे कोणी काम कसं करू शकतो. लहान मुलांपासून तर वृद्ध महिलांपर्यंत सर्वजण इथे मोठ्या आनंदाने काम करत होते तेव्हा असं लक्षात आलं यालाच जीवन ऐसे नाव आहे.
या सातरा मध्ये कुणी एकटा तर कुठे पती-पत्नी तर कुठे संपूर्ण कुटुंब कामाला असतो सध्या शाळांना सुट्टी लागल्यामुळे मुलं आपल्या आई-वडिलांना मदत करण्यासाठी येतात तर रोजगार हमीचे काम बंद असल्याने आणि शेतीचे काम बंद असल्याने हाताला काम मिळत नसल्याने स्त्री-पुरुष या कामावर येतात. सुरुवातीला या कामाचा त्रास होतो, हाताला जळजळ होणे खोकला येणे मात्र कालांतराने याची सवय होऊन नंतर प्रत्येक जण हा काम आवडीने करतो.
एक किलो मिरची चे डेट तोडून वेगळे करण्याचे दहा रुपये मिळतात दररोज एक व्यक्ती 15 ते 20 किलो मिरचीचा डेट तोडण्याचे काम करतो यातून दररोज दीडशे ते दोनशे रुपये रोज तो कमवितो कुटुंब असल्यास 600 ते 700 रुपये दररोज पूर्ण कुटुंबाची रोजी होते त्यामुळे हाताला काम मिळालेला आहे याचा समाधान आहे असे येथील मजुर सांगतात, मिळणारी रोजी अपेक्षेनुसार कमी असली तरी उन्हाळ्याच्या काळात हा रोजगार आम्हाला जीवन जगण्यास मदत करतो त्यामुळे आम्ही समाधानी आहोत असे या मजुरांचे मत आहे.
दरवर्षी दक्षिण भागातून ही मिरची खरेदी करून व्यापारी पवनी तालुक्यात विविध ठिकाणी हे सातरा लावतात, अशा पद्धतीचे 70 ते 80 सातरा संपूर्ण पवनी तालुक्यामध्ये आहेत या सातराच्या माध्यमातून वीस ते तीस हजार लोकांना दरवर्षी हाताला काम मिळतो नोव्हेंबर ते मे या कालावधीमध्ये हे काम सुरू असते. लाल मिरचीच्या डेट तोडून चांगल्या मिरच्या वेगळ्या केल्या जातात आणि या मिरच्या गरजेनुसार विदेशात आणि देशात पाठविले जातात.
बाईट : धनपाल अहिकर, रुपाली अहिकर, बारसागडे

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.