ETV Bharat / state

10 वीच्या परीक्षेत सीसीटीव्ही ठेवणार कॉपीबहाद्दरांवर नजर; जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग - 10th examination

मोहाडी तालुक्यातील जांभोरा गावात असलेल्या जय संतोषी माँ विद्यालयातील, परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवारी या कॅमेऱयाच्या निगराणीत परीक्षा घेण्यात येत आहेत.

जांभोरा गावातील शाळेत 10 वीच्या परीक्षेसाठी लावले सीसीटीव्ही कॅमेरे

author img

By

Published : Mar 4, 2020, 2:22 AM IST

भंडारा - राज्यात मंगळवारपासून १० वी बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षा केंद्र कॉपीमुक्त राहावे यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील एका शाळेने ग्रामपंचायतीच्या मदतीने सीसीटीव्ही कॅमेरे परीक्षा केंद्रावर लावून घेतले. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत दहावीची परीक्षा सुरळीत पार पडत आहेत. पहिल्यांदाच एखाद्या शाळेने परीक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावून घेतल्याने संपूर्ण जिल्ह्यात या शाळेची चर्चा होत आहे.

जांभोरा गावातील शाळेत 10 वीच्या परीक्षेसाठी लावले सीसीटीव्ही कॅमेरे

परीक्षा केंद्र कॉपीमुक्त असावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे पथक तयार करून त्याद्वारे जिल्हा कॉपीमुक्त राहील यासाठी प्रयत्न केले जातात. महाराष्ट्र शासनाच्या जीआरनुसार प्रत्येक शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे लावून परीक्षा घेण्याचे निर्देश असतानाही याची अंमलबजावणी केली जात नाही. मात्र, मोहाडी तालुक्यातील जांभोरा गावात असलेल्या जय संतोषी माँ विद्यालयातील, परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मंगळवारी या कॅमेऱयाच्या निगराणीत परीक्षा घेण्यात येत आहेत.

जांभोरा ग्रामपंचायत व विद्यालयाच्या संकल्पनेने या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना भयमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी व परिक्षा केंद्र कॉपीमुक्त व्हावे म्हणून सीसीटीव्ही लावण्यात आले असल्याने याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. पहिल्यांदाच ग्रामीण भागामध्ये कॉपीमुक्त सेंटर ठेवण्यासाठी सीसीटीव्हीची उपायोजना करण्यात आली आहे. ती किती फायदेमंद ठरते याची पाहणी करण्याकरता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष स्वतः या केंद्रावर पोहचले होते. हा उपक्रम अतिशय योग्य असून येणाऱ्या काळात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. त्यामुळे शैक्षणिक दर्जा वाढेल आणि जिल्हा कॉपीमुक्त होऊ शकेल असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा; भंडाऱ्यात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची लावली गैरहजेरी

दरवर्षी परीक्षा केंद्रांवर मोठ्या प्रमाणात कॉपी घेणारे पालक आणि कॉपी करणारे विद्यार्थी यामुळे हुशार आणि होतकरु विद्यार्थ्यांना पेपर सोडवताना बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना भयमुक्त पद्धतीने पेपर सोडविण्याची मुभा मिळावी आणि गावातील सेंटर कॉपीमुक्त व्हावे. याच हेतूने ग्रामपंचायतीने हे सीसीटीव्ही कॅमेऱयाचे प्रयोजन केलेले आहे, असे जांभोराच्या सरपंचांनी सांगितले.

हेही वाचा - बांधावरचा 'केसर' तांदूळ आता थेट ग्राहकांपर्यंत, शेतकरी ठरवणार दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.