ETV Bharat / state

बसप राज्यात लोकसभेच्या सर्व जागा लढवणार

बहुजन समाज पार्टी (बसप) महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार आहे. तसेच या निवडणुकीत बसपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट देणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा खासदार अशोक सिद्धार्थ यांनी दिली आहे.

author img

By

Published : Feb 19, 2019, 1:47 PM IST

महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा खासदार अशोक सिद्धार्थ

भंडारा - बहुजन समाज पार्टी (बसप) महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा लढवणार आहे. २०१९ च्या निवडणुकीमध्ये बसपला महाराष्ट्रात खाते उघडायचे आहे, यामुळे फक्त कार्यकर्त्यांनाच तिकीट मिळणार असून बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट मिळणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अशोक सिद्धार्थ यांनी सांगितले.

बसपला महाराष्ट्रात प्रत्येक वेळी बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट वाटते, ही ओळख पुसून काढण्यासाठी बसपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट देणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा खासदार अशोक सिद्धार्थ यांनी दिली. ते सध्या लोकसभेचे उमेदवार निवडण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी दमदार उमेदवार देण्याची आमची तयारी आहे. आम्हाला यावर्षी महाराष्ट्रामध्ये कमीत-कमी २ ते ३ जागा जिंकून आपले खाते उघडायचे आहे, असे सिद्धार्थ यांनी म्हटले आहे.

undefined

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची चाचपणीचे कार्य सुरू आहे. प्रत्येक जिल्ह्यातून ३ नावांची निवड केली जात आहे, या ३ नावांपैकी एक नाव हे लोकसभेसाठी ठरवले जाणार आहे. याच चाचपणीसाठी जिल्ह्यात आलेल्या नेत्यांसमोर इच्छुक उमेदवारांनी आपली दावेदारी कशी मजबूत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भंडारा येथे निवडणूक लढवली असल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा ही जागा बसपसाठी खूप महत्त्वाची आहे, असे मत पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले.

बसप अनुशासित तत्वावर काम करत असते. हा पक्ष आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा असल्याने संधीसाधू असलेल्या इतर पक्षाशी आम्ही कोणतीही युती करणार नाही. मात्र, आंबेडकरांच्या तत्त्वावर चालणाऱ्या पक्षांनी जर आमच्याशी युती करायची असल्यास त्यांनी बसप सुप्रीमो मायावती यांच्याशी संपर्क करावा, त्यावर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार त्यांना आहेत, सध्या त्यांनी महाराष्ट्रात ४८ जागेवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच आम्ही काम करत आहोत, अशी माहिती सिद्धार्थ यांनी दिली.

Intro:Anc : 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बीएसपी ला महाराष्ट्र मध्ये स्वतःचे खाते उघडायचे आहे, बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्व 48 जागा लागणार आहे आणि यावेळी फक्त कार्यकर्त्यांनाच तिकीट मिळणार असून बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट मिळणार नसल्याचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अशोक सिद्धार्थ यांनी सांगितले.

Body:बहुजन समाज पार्टी महाराष्ट्रमध्ये दरवेळेस बाहेरून आलेल्या लोकांना तिकीट वाटते अशी त्यांची ओळख झालेली आहे, ही ओळख पुसून काढण्यासाठी यावेळेस बी एस पी चे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांन पैकीच एकाला तिकीट देण्याचे ठरवून प्रत्येक लोकसभेत कोण योग्य उमेदवार आहे याची चाचपणी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी तथा खासदार अशोक सिद्धार्थ हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पार्टी तर्फे लोकसभेच्या सर्व 48 जागा लढविल्या जाणार असून सर्व लोकसभेतून दमदार उमेदवार देण्याची आमची तयारी आहे आम्हाला यावर्षी महाराष्ट्र मध्ये कमीत कमी दोन ते तीन जागा जिंकून आपले खाते उघडायचे असल्याचा यावेळी अशोक सिद्धार्थ यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चाचपणी चे कार्य सुरू आहे प्रत्येक जिल्ह्यातून तीन नावे ही फायनल केली जात आहेत या तीन नावांपैकी एक नाव हा लोकसभेसाठी ठरविला जाणार आहे. याच चाचपणीसाठी भंडारा जिल्ह्यात आलेल्या नेत्यांसमोर इच्छुक उमेदवारांनी लोकसभेसाठी आपली दावेदारी कशी मजबूत आहे हे दाखविण्याची प्रयन्त केले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भंडारा येथे निवडणूक लढवली असल्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा ही जागा बहुजन समाज पार्टी साठी खूप महत्त्वाची आहे. पक्षासाठी कार्य करणाऱ्या लोकांपैकी एकाला तिकीट मिळणार असल्याने सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन जोश निर्माण झालेला आहे.
बहुजन समाज पक्ष अनुशासित तत्वावर काम करीत असते आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा पक्ष असल्याने संधीसाधू असलेल्या इतर पक्षाशी आम्ही कोणतेही गट बंधन करणार नाही मात्र आंबेडकरांच्या तत्त्वावर चालणाऱ्या पक्षांनी जर आमच्याशी गटबंधन करायचे असल्यास त्यांनी बीएसपी सुप्रीमो मायावती त्यांच्याशी संपर्क करावा, त्यावर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार त्यांना आहेत, सध्या त्यांनी महाराष्ट्र संपूर्ण 48 जागेवर निवडणूक लढविण्याचे निर्णय घेतल्याने आम्ही त्या दृष्टिकोनातूनच प्रयत्न सुरू केलेल्या असल्याचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी अशोक सुद्धा त्यांनी सांगितले आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.