ETV Bharat / state

निमंत्रण पत्रिकेत भाजप खासदाराचे नाव नसल्याने कार्यकर्ते संतप्त, शिक्षणाधिकाऱ्यांना दिला वाण

जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमंत्रण  पत्रिकेवर भाजप खासदाराचे नाव नसल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी आणि  मुख्याध्यापिकेला मकर संक्रांतीला वाटला जाणारा वाण दिला.

Bjp workers agitation against Zilha prishad school in bhandara
निमंत्रण पत्रिकेत भाजप खासदाराचे नाव नसल्याने कार्यकर्ते संतप्त
author img

By

Published : Jan 20, 2020, 1:42 PM IST

भंडारा - जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवर भाजप खासदाराचे नाव नसल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले. संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापिकेला मकर संक्रांतीला वाटला जाणारा वाण दिला. शाळेसारख्या पवित्र मंदिरातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक राजकारण करत असल्याचा आरोप भाजप कार्यकत्यांनी केला आहे.

निमंत्रण पत्रिका बदलावी अन्यथा स्नेहसंमेलन होऊ देणार नाही असा इशारा भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे. भंडारा शहरात असलेली सर्वात जुनी लालबहाद्दूर शास्त्री जिल्हा परिषद शाळेत 23, 24 आणि 25 जानेवारीला स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने छापलेली निमंत्रण पत्रिका म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीचा मेळावा आहे की काय असे पत्रिका वाचल्यावर वाटते. कारण या पत्रिकेवर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्षापासून तर काँग्रेस राष्ट्रवादीचे लहान-मोठे सर्वच नेत्यांची नावे आहेत. मात्र, भंडारा-गोंदियाचे पहिले नागरिक असलेले खासदार सुनील मेंढे तसेच भंडारा पंचायत समितीचे अध्यक्ष यांचे नाव मुद्दाम डावलण्यात आले असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

निमंत्रण पत्रिकेत भाजप खासदाराचे नाव नसल्याने कार्यकर्ते संतप्त

कार्यक्रम पत्रिका भाजप कार्यकर्त्यांच्या हातात पडताच हे कार्यकर्ते एकत्रित लालबहादूर शास्त्री शाळेत पोहोचले. मात्र, प्राचार्य उपस्थित नसल्याने आपले निवेदन येथील शिक्षकांना देत प्राचार्याच्या टेबलांवर वान ठेवण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा शिक्षणाधिकारी यांच्या दालनात पोहोचला. तिथे शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शाळेच्या प्राचार्यांनी कोणती चूक केली हे दाखवून दिली. केवळ जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने त्यांच्याच नेत्यांना निमंत्रण पत्रिकेत नाव छापले आहेत. ही मुद्दाम केलेली घोडचूक दुरुस्त करावी, अशी मागणीही यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना केली. काँग्रेसला चमचा आणि राष्ट्रवादीला खुळखुळा वान म्हणून दिला. छापलेली निमंत्रण पत्रिका रद्द करून नवीन पत्रिकेमध्ये खासदार सुनील मेंढे, पंचायत समिती अध्यक्ष यांच्या नावाचा उल्लेख न झाल्यास स्नेहसंमेलन होऊ देणार नाही अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. शिक्षणासारख्या पवित्र ठिकाणासुद्धा घाणेरडे राजकारण होत आहे. त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही हे आंदोलन केले असल्याचे प्रशांत खोब्रागडे यांनी सांगितले.

Intro:Anc : - जिल्हा परिषद शाळेच्या स्नेहसंमेलना मधील निमंत्रण पत्रिकेवर केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्याच लोकांचे नाव असून खासदार सुनील मेंढे यांचे नाव नसल्याने भाजपाच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकारी यांना आणि जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेच्या टेबलावर मकर संक्रांतीला वाटल्या जाणार वाण दिला. शाळे सारख्या पवित्र मंदिरातही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची लोक राजकारण करतात असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. निमंत्रण पत्रिका बदलावी अन्यथा स्नेहसंमेलन होऊ देणार नाही असे भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितले आहे.Body:भंडारा शहरात असलेली सर्वात जुनी लालबहाद्दूर जिल्हा परिषद शाळेत 23, 24 आणि 25 जानेवारीला स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने छापलेली निमंत्रण पत्रिका म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीचा मिळावा आहे की काय असं पत्रिका वाचल्यावर वाटते कारण या पत्रिकेवर जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष पासून तर काँग्रेस राष्ट्रवादीचे लहान-मोठे सर्वच नेत्यांचा नाव आहे मात्र भंडारा-गोंदिया चे पहिले नागरिक असलेले खासदार सुनील मेंढे तसेच भंडारा पंचायत समितीचे अध्यक्ष यांचे नाव मुद्दाम डावलण्यात आले आहे असा आरोप भाजपा तर्फे केला जात आहे. पत्रिका भाजपा कार्यकर्त्यांच्या हातात पडताच हे कार्यकर्ते एकत्रित लालबहादूर शास्त्री शाळेत पोहोचले, मात्र प्राचार्य उपस्थित नसल्याने आपले निवेदन येथील शिक्षकांना देत प्राचार्याच्या टेबलांवर वान ठेवण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा शिक्षणाधिकारी यांच्या दालनात पोहोचला तिथे शिक्षणाधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शाळेच्या प्राचार्यांनी कोणती चूक केली हे दाखवून देत केवळ जिल्हा परिषदेवर काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असल्याने त्यांच्याच नेत्यांना निमंत्रण पत्रिकेत नाव छापल्या गेलेत. ही मुद्दाम केलेली घोड चूक दुरुस्त करावी अशी मागणीही यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना काँग्रेसचा चमचा आणि राष्ट्रवादीचा खुळखुळा वान म्हणून दिला. छापलेली निमंत्रण पत्रिका रद्द करून नवीन पत्रिकेमध्ये खासदार सुनील मेंढी पंचायत समिती अध्यक्ष यांच्या नावाचा उल्लेख न झाल्यास स्नेहसंमेलन होऊ देणार नाही अशी भूमिका भाजपा कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे.
शिक्षणासारख्या पवित्र काम ज्या शाळेमध्ये होते तिथे अशा पद्धतीचा घाणेरडे राजकारण करणं अतिशय वाईट आहे आणि त्याचा निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही हा आंदोलन केला असल्याचं प्रशांत खोब्रागडे यांनी सांगितले.

बाईट : प्रशांत खोब्रागडे भंडारा जिल्हा महासचिव भाजपConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.