भंडारा - आमदार चरण वाघमारे यांना मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने 5 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने आजची रात्र त्यांना जेलमध्ये घालावी लागणार आहे. बुधवारी सकाळी अकरानंतर त्यांची सुटका होणार आहे.
हेही वाचा - भाजपकडून अनेक विद्यमान आमदारांचे पत्ते कट; 'या' नवीन चेहऱ्यांना संधी
मंगळवारी बेल मिळाल्यानंतर त्यांची सुटका होईल या अपेक्षेने कार्यकर्ते जिल्हा कारागृहसमोर जमा झाले होते. मात्र, त्यांना आल्या पावली परत जावे लागले, तर मंगळवारी आमदार चरण वाघमारे यांनी जेलमधूनच नामांकन अर्ज भरला आहे. अपक्ष आणि भाजप उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरल्याने भाजपतर्फे किंवा अपक्ष ते निवडणूक लढवतील हे ठरले आहे त्यामुळे तुमसर विधानसभा क्षेत्राचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
विनयभंगाच्या आरोपावरून कारागृहात असलेले तुमसर विधानसभा क्षेत्राचे आमदार चरण वाघमारे यांना मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने 5 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सोमवारी जामिनासाठी अर्ज करण्यात आहे होते त्यामुळे मंगळवारी जामीन मिळावा यासाठी सकाळपासूनच धावपळ सुरू होती दुपारी साडेचार वाजता त्यांना जिल्हा सत्र न्यायालयातून जामीन मंजूर करण्यात आला. मात्र हे प्रकरण तुमसर कनिष्ठ न्यायालयातील असल्याने पुढील कागदोपत्री कारवाईसाठी तुमसर न्यायालयात पाठवण्यात आले.
जामीन मिळाल्याचे माहीत होताच भंडारा आणि तुमसर विधान क्षेत्राचे कार्यकर्ते हे जिल्हा कारागृहसमोर पोहोचले. मात्र, तुमसरच्या न्यायालयातून कागदपत्र परत मिळवण्यास विलंब झाल्याने आणि कारागृहाच्या नियमानुसार सायंकाळी 5 नंतर कोणत्याही आरोपीची रवानगी करता येत नसल्याने बेल मिळूनही कागदपत्रांची जमवाजमव करण्यास उशीर झाल्याने आमदार चरण वाघमारे यांना मंगळवारची रात्र कारागृहातच काढावी लागणार आहे.
भाजपची मंगळवारी पहिली यादी जाहिर झाली. यादीमध्ये भंडारा जिल्ह्याच्या तिनही विधानसभा क्षेत्राच्या उमेदवारांचे नाव नव्हते. त्यामुळे या तीनही विधानसभा क्षेत्रात नवीन उमेदवार दिले जाईल अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे. बुधवारी सकाळी 11 नंतर त्यांची सुटका होणार असल्याने त्यानंतर त्यांची काय भूमिका आहे याकडे आणि तुमसर विधानसभा क्षेत्रातील लोकांचे लक्ष लागून आहे.
हेही वाचा - भाजपमध्ये दाखल झालेल्या 'या' आयारामांना मिळाली संधी