ETV Bharat / state

Bicycle Parade : भंडाऱ्यात भव्य सायकल परेड; 2450 सायकलस्वारांनी घेतला सहभाग

author img

By

Published : Mar 29, 2022, 4:29 PM IST

Updated : Mar 29, 2022, 8:54 PM IST

"माझी वसुंधरा" अभियानाच्या (Vasundhara Abhiyan) माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त समन्वयाने मंगळवारी सकाळी रेल्वे ग्राऊंड खात रोड भंडारा येथे भव्य सायकल परेडचे (Bicycle Parade in Bhandara) आयोजन करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकल परेडचे आयोजन करण्यात आले होते.

Bicycle Parade
भंडारा सायकल परेड

भंडारा - भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त, आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाअंतर्गत "माझी वसुंधरा" अभियानाच्या (Vasundhara Abhiyan) माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय व नगरपालिका प्रशासनाच्या संयुक्त समन्वयाने मंगळवारी सकाळी रेल्वे ग्राऊंड खात रोड भंडारा येथे भव्य सायकल परेडचे (Bicycle Parade in Bhandara) आयोजन करण्यात आले होते. भंडारा जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात सायकल परेडचे आयोजन करण्यात आले होते. या सायकल परेडमध्ये 2450 लोकांनी सहभाग घेतला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सायकल परेडला सुरुवात करण्यात आली, तर भंडारा विधानसभेचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि भंडारा गोंदिया विधान परिषदेचे आमदार परिणय फुके यांनी स्वतः सायकल चालवत या परेडमध्ये सहभाग घेतला. या आगळ्यावेगळ्या सायकल परेडचा लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्याचे आयोजकांचा प्रयत्न आहे.

भंडाऱयात सायकल परेड

रस्त्यांवर पोलीस बंदोबस्त तैनात - निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्याच्या या अनोखा प्रयत्नांत सकाळी सहा वाजेपासून रेल्वे ग्राउंडवर विद्यार्थी आणि इतर सायकलपटू एकत्रित आले होते. सायकलपटूच्या मार्गांमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होत. उपस्थित सायकलस्वार यांनी भारतीय ध्वज, रंगवली टोप्या परिधान करून विशाल मानवी शृंखला यांच्या माध्यमातून तिरंगा साकार केला.

वसुंधरेची निघा राखण्याची शपथ - सकाळी साडेसातच्या दरम्यान सुरुवातीला जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्वांना वसुंधरेची निघा राखण्याची शपथ दिली. त्यानंतर राष्ट्रगीत पार पडले आणि त्यानंतर तिरंगा च्या रंगातील फुले आकाशात सोडण्यात आली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हिरवी झेंडी दाखवून सायकल परेडला सुरूवात केली. तर आमदार नरेंद्र भोंडेकर आणि आमदार परिणय फुके यांनी स्वतः सायकल चालवत हे सात किलोमीटरचे अंतर पार पाडून या योजनांमध्ये सहभाग नोंदविला.

Bicycle Parade
भंडाऱयात सायकल परेडचे आयोजन

असा राहिला सायकल परेडचा मार्ग - रेल्वे ग्राउंड पासून एकेक करून सायकलस्वार निघाले, खुर्शीपार नाका आणि त्यानंतर पुन्हा रेल्वे ग्राउंडपर्यंत असा एकूण सात किलोमीटरचा प्रवास या सायकलस्वरांनी पार केला. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर, गृहिणी अशा सर्वच लोकांनी सहभाग घेतला होता. एकामागून एक जाणाऱ्या आणि येणाऱ्या 2450 सायकलपटूना पाहण्यासाठी नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दोन्ही बाजुला गर्दी केली होती.

Bicycle Parade
भंडाऱयात सायकल परेडचे आयोजन

सुरूवातीला एका छोट्या सायकल परेडचे आयोजन करण्याचे निश्चित केले होते. मात्र, बघता बघता भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या प्रतिसादाबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. यानंतरही पर्यावरणाच्या दृष्टीने पोषक असलेल्या माझी वसुंधरा या उपक्रमात नाविन्यपूर्ण उपक्रम करून पर्यावरण रक्षणाचे प्रयत्न करू, असे त्यांनी यावेळी सांगितले.

आदित्य ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण - पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नागपूरमध्ये घेतलेल्या विभागीय बैठकीत माझी वसुंधरा या उपक्रमांतर्गत चांगले उपक्रम राबवावे अशी सूचना केली होती. भंडारा जिल्हाधिकारी यांनी आदित्य ठाकरे यांचे हे स्वप्न पूर्ण करत एक भव्यदिव्य सायकल परेडचे आयोजन केले. त्यानिमित्त त्यांचे अभिनंदन करतो आणि भंडारा जिल्ह्यातील नागरिकांनी माझी वसुंधरा अंतर्गत पर्यावरणाला पोषक अशा गोष्टी कराव्यात आणि त्यादृष्टीने प्रयत्न करावे, असे यानिमित्त सांगतो असे भंडारा विधानसभाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी सांगितले.

Last Updated : Mar 29, 2022, 8:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.