ETV Bharat / state

'तुम्ही चुकीच्या माणसाला काळे झेंडे दाखवले', गडकरींनी दिले स्पष्टीकरण

मागील कित्येक वर्षांपासून भंडारा शहराला बायपास हवा आहे अशी मागणी नागरिकांची होती नागरिकांची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे. (Bhumi Pujan of Bhandara Bypass ) केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या भंडारा-निलज राष्ट्रीय महामार्गाचे बायपासचे गुरूवार (दि. 3 मार्च)रोजी डिजिटल स्वरूपात भूमिपूजन संपन्न झाले.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी
author img

By

Published : Mar 4, 2022, 7:40 AM IST

Updated : Mar 4, 2022, 6:33 PM IST

भंडारा - केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांच्या पाच वर्षांपासून भंडारा-निलज राष्ट्रीय महामार्गाचे बायपासचे गुरूवार (दि. 3 मार्च)रोजी डिजिटल स्वरूपात भूमिपूजन संपन्न झाले. (Bhandara-Nilaj Highway) राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरी भंडारा बायपासमुळे रायपूर-बिलासपूर -कलकत्ता ही प्रमुख शहरे जोडली जातील. दरम्यान, रस्त्यांवर मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे अपघातांच्या संख्येत चांगलीच वाढ झालेली आहे. वाढलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. (Union Minister Nitin Gadkari) याचा निषेध म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी गडकरी यांना काळे झेंडे दाखवत आपला निषेध नोंदवला. यावेळी आयोजीत कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी हे काळे झेंडे चुकीच्या माणसाला दाखवले. (Bhumi Pujan Bhandara Bypass Nitin Gadkari) हा रस्ता फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी अडवून ठेवला असून सध्या मुख्यमंत्री हेच वनमंत्री आहेत अशी आठवण उपस्थितांना करून दिली.

कार्यक्रमात बोलताना गडकरी

जिल्हा वासीयांची कित्येक वर्षांची प्रतीक्षा संपली

आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा बायपासमुळे वाहतुक सुरळीत होऊन अपघातांचे प्रमाण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला. तर आमदार परिणय फुके यांनी नागपूर - तुमसर रस्ता व तुमसरवरून बायपास करून देण्याची मागणी केली. भंडारा जिल्हावासीयांना या सहापदरी बायपासची निकड होती. ती पुर्ण केल्याने खासदार सुनिल मेंढे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भंडारा - नागपूर या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी हा रस्ता ही सहापदरी करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मान्यवरांची उपस्थिती

मागील कित्येक वर्षांपासून भंडारा शहराला बायपास हवा आहे अशी मागणी नागरिकांची होती नागरिकांची ही प्रतीक्षा आता संपलेली आहे.
प्रस्तावित बायपासविषयीचे संगणकीय सादरीकरण यावेळी करण्यात आले. भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार परिणय फुके, उपस्थित होते.

कसा आहे बायपास मार्ग

भंडारा बायपास हा 100 कि. मी. प्रती तास या वेगाकरीता तयार करण्यात आला आहे. बायपासची लांबी 14.80 कि.मी असून कामाची किंमत 421.80 कोटी इतकी आहे. या बायपासच्या मुख्य रस्त्याची रुंदी 32 मीटर असणार आहे. 3 मोठे पुल,2 फ्लॉयओव्हर, दोन्ही बाजूस 6 बस शेल्टर असतील. भंडारा बायपास मुख्य रस्त्याची रुंदी 7 मीटर व लांबी 17.46 किलोमीटर व 2 मीटर फुटपाथ ड्रेनसह असणार आहे. एक्सेस कंट्रोल ग्रीन फिल्ड बायपासची लांबी 10.34 कि.मी असणार आहे. 17 व्हेईकुलर अंडरपास असणार असून संपूर्ण बायपास व पुलावर दोन्ही बाजुस दिव्यांची व्यवस्था असणार आहे. या बायपासमुळे भंडारा शहरात होणारी वाहतुक कोंडी टळणार आहे. तसेच नागपूर व रायपूर या दोन प्रमुख शहरांमधील दळणवळण सोयीचे होईल. शहरातील जुन्या दोन पदरी पुलावर होणाऱ्या वाहतुकीला वळण लागणार असून वेळ व इंधनाची बचत होईल.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

बायपासचे भूमिपूजन करण्याअगोदर नितीन गडकरी यांनी अंभोरा या पर्यटन स्थळी भेट दिली. त्यावेळी त्यांनी येथील नदीवर बांधण्यात येत असलेल्या पुलाची पाहणी केली. तसेच, बोटीने प्रवास करून भंडारा जिल्ह्यात आले. तिथून त्यांचा ताफा हा भूमिपूजनाच्या दिशेने जात होता. त्यावेळी पहिला गावाजवळ काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. भंडारा पवनी हा राष्ट्रीय महामार्ग मागील तीन वर्षांपासून रखडलेला असल्याचा निषेध या कार्यकर्त्यांनी यावेळी केला.

फॉरेस्ट वाले कामचोर आहेत नितीन गडकरी

भूमी पूजनानंतर गडकरी यांनी त्यांच्या भाषणात काळे झेंडे दाखवणाऱ्या लोकांना हा त्यांचा अधिकार असल्याचे सांगितले. मात्र, हे काळे झेंडे चुकीच्या माणसाला दाखवले. हा रस्ता फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांनी अडवून ठेवला असून सध्या मुख्यमंत्री हेच वनमंत्री आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले. हे झेंडे मला दाखवण्यापेक्षा फॉरेस्ट अधिकाऱ्यांना दाखवा असही गडकरी म्हणाले. हे फॉरेस्ट अधिकारी काम चोर आहेत यांच्यावर लवकरच कार्यवाही करू असही ते यावेळी म्हणाले आहेत.

खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन

भूमिपूजनाच्या कार्यक्रमानंतर नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन झाले. प्रो कबड्डी मध्ये बंगाल वॉरियर्सतर्फे खेळलेल्या आकाश पिकलमुंडे यांच्यासह जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंचा यावेळेस नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अशा पद्धतीच्या क्रीडा महोत्सवातून जिल्ह्यातील प्रतिभावंत खेळाडूंना राज्यपातळीवर आणि देशपातळीवर स्वतःची प्रतिभा दाखविण्याची संधी उपलब्ध होते. देशाला उत्तम खेळाडू मिळावे यासाठी याचे आयोजन दरवर्षी मोठ्या प्रमाणात व्हावे आणि खेळाडूंसाठी योग्य दर्जाचे मैदान निर्माण करावे अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

हेही वाचा - इक्बाल मिर्चीकडून फडणवीसांनी 20 कोटी घेतले- ईडीकडे अनिल गोटेंची तक्रार

Last Updated : Mar 4, 2022, 6:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.