भंडारा - जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील सानगडी येथे भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत रात्री चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. बॅंकेची तिजोरी फोडून चोरट्यांनी मोठा मुद्देमाल लंपास केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या तसेच एटीएम फोडीच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
चोरांनी बँकेच्या मागच्या बाजुला असलेली खिडकी गॅस कटरच्या साह्याने तोडून आत प्रवेश केला. तिजोरीतून 32 लक्ष रुपये व सोने चोरांनी चोरले आहे. चोरांनी बँकेतील सीसीटीव्ही व इतर सिस्टम देखील चोरून नेले आहेत. घटनास्थळी साकोली पोलीस स्टेशनची टीम, अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पथक आणि श्वानपथक पोहोचले असून तपास सुरू आहे.
हेही वाचा - महाराष्ट्र गारठला, परभणीचा पारा ५.१ अंशावर