ETV Bharat / state

भंडारा शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २४x७ पोलिसांचे फिरते पथक - beat marshal in bhandara news

शहरातील कायदा व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने गुरुवारी डेल्टा मोबाईल आणि बिट मार्शल या दोन पेट्रोलिंग गाड्याची सुरवात केली आहे. भंडारा पोलीस स्टेशनमध्ये या गाड्यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते पूजा करून सुरुवात करण्यात आली आहे.

भंडारा पोलीस
भंडारा पोलीस
author img

By

Published : Nov 6, 2020, 5:04 AM IST

भंडारा - शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी फिरते पोलीस पथक निर्माण केले आहे. हे पथक २४ तास शहरातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असणार आहे. गुन्हेगारी कमी करण्यासाठी आणि समाज कंटकांवर वचक बसविण्यासाठी हे पथक फायद्याचे ठरणार आहे.

डेल्टा मोबाईल आणि बिट मार्शलची सुरवात

भंडारा शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी २४x७ पोलिसांचे फिरते पथक
महिनाभरापूर्वी वसंत जाधव हे नवीन पोलीस अधीक्षक जिल्ह्यात रुजू झाले आहेत. 7 वर्षांपूर्वी भंडारा येथे उपपोलीस अधीक्षक पदाचे काम पाहिले असल्याने त्यांना जिल्ह्याविषयी संपूर्ण माहिती आहे. त्यांनी शहरातील कायदा व्यवस्था सुरळीत करण्याच्या उद्देशाने गुरुवारी डेल्टा मोबाईल आणि बिट मार्शल या दोन पेट्रोलिंग गाड्याची सुरवात केली आहे. भंडारा पोलीस स्टेशनमध्ये या गाड्यांची जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते विधीवत पूजा करून सुरुवात करण्यात आली आहे.

24×7 सेवा

दिवसेंदिवस भंडारा शहराचा विस्तार वाढत असताना कायदा आणि सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस विभागाला प्रचंड कसरत करावी लागत आहे. एखादी घटना घडून गेल्यावरही पोलीस तेथे पोहचू शकत नाही त्यामुळे नेहमी बिकट प्रसंगाला पोलिसांना सामोरे जावे लागते. सध्या सुरू असलेली गस्ती यंत्रणा अपूरी असल्यामुळे जनतेला मदतीची गरज असतानाही वेळेत पोहचू शकत नाही. त्यामूळे शहराचे दोन भागात विभाजन करून बिट मार्शल 1 आणि बिट मार्शल 2 या मोटारसायकलवर सशस्त्र पोलीस कर्मचारी नेहमी गस्तीवर असतील. त्यामुळे कुठेही भांडण होत असेल, मारामारी दंगल सारख्या घटना घडत असतील तर हे पथक तिथे पोचून परिस्थिती नियंत्रणात आणू शकेल.

एखादी घटना घडत असताना पोलीस वेळेत पोहचले तर परिस्थिती लवकर नियंत्रणात येते. तर डेल्टा या वाहनात 1 अधिकारी आणि 5 सशस्त्र पोलीस तसेच, स्टेचर, लाईव्ह जॅकेट, फर्स्ट एड बॉक्स, प्रोटेक्शन गन या वस्तू ठेवल्या असून या घटनेच्या ठिकाणी पोहचणून लोकांना मदत करणे या उद्देश डेल्टा मोबाईल या वाहनाची सुरवात केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.