भंडारा - जिल्ह्यात एकही रुग्ण न आढळल्याने भंडारा सध्यातरी धोक्याबाहेर आहे. जिल्हा रुग्णालयातून नागपूर येथे तपासणीला पाठविलेले सर्वच 79 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने काही प्रमाणात सुटकेचा निश्वास घेतला आहे. अस असेल तरी संभावित धोका टाळण्यासाठी प्रशासन सज्ज असून जिल्ह्याच्या सर्व सीमा पूर्णपणे बंद ठेवल्या आहेत. तर 9 लोकांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातलेला आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यासाठी समाधानाची गोष्ट म्हणजे भंडाऱ्यात आतापर्यंत एकही कोरोणाचा रुग्ण आढळला नाही. त्यातच दुसरी समाधानाची गोष्ट म्हणजे नऊ तारखेपर्यंत पाठवलेल्या सर्व 79 घशाचा अहवाल निगेटिव आलेले आहे. आरोग्य यंत्रणेसाठी आणि जिल्हा प्रशासनासाठी ही समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल. यापुढेही ही भंडारा जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण आढळू नये, यासाठी 9 तारखेपासून संचारबंदी अधिक सक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यत आता पर्यंत विदेशातून किंवा इतर राज्यातून आलेल्या कोणत्याच व्यक्तींना कोरोना झाल्या नसल्याने कोणी रुग्ण ही आढळला नाही. त्यामुळे साहजिक कोणाला प्रादुर्भाव झाला नाही. सध्या संचारबंदी सुरू असल्याने संक्रमित जिल्ह्यातील किंवा राज्यातील नागरिक यांना भंडारा जिल्ह्यात येण्यास थांबवू शकल्यास भंडारा जिल्ह्या पुढेही कोरोना मुक्त ठेवण्यास नक्कीच मदत मिळेल.