ETV Bharat / state

'ई टीव्ही भारत'च्या बातमीचा दणका, भंडाऱ्यात नियम तोडणाऱ्यांवर पुन्हा कारवाई सुरू - भंडारा कारवाई न्यूज

अधिकारी कोमात आणि नियम तोडणारे जोमात ही बातमी ई टीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आज (गुरुवार) जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी भंडारा यांना तातडीने नियम तोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले.

Action will be taken against the break the rules in bhandra
भंडाऱ्यात नियम तोडणाऱ्यांवर पुन्हा कारवाई सुरू
author img

By

Published : Jun 11, 2020, 9:14 PM IST

Updated : Jun 23, 2020, 8:56 PM IST

भंडारा - अधिकारी कोमात आणि नियम तोडणारे जोमात ही बातमी ई टीव्ही भारतने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर आज (गुरुवार) जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी भंडारा यांना तातडीने नियम तोडणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशाचे पालन करत नगरपालिकेचे कर्मचारी पाचनंतर दुकाने सुरू ठेवणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी गेले असता या दुकानदारांनी कर्मचार्‍यांशी जोरदार भांडण केले. एवढंच नाही तर स्थानिक नेत्यांनीही तिथे पोहोचत कारवाई करू दिली नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला आहे की, कारवाई करावी तरी कशी.

भंडाऱ्यात नियम तोडणाऱ्यांवर पुन्हा कारवाई सुरू
चौथ्या लॉकडाऊननंतर सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची शिथिलथा देण्यात आली होती. मात्र, अजूनही काही दुकानदार या नियमांचे पालन करीत नाहीत. अशा दुकांदारांवर भंडारा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दंडात्मक कारवाई करणे सुरू केले. मात्र, एका नेत्याला नियम तोडणाऱ्या व्यक्तीचा पुळका आला आणि त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना सांगून, त्या कर्मचाऱ्याला सुनावले. त्यानंतर या कार्यवाही थांबल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत लोकांनी दुकाने उशिरापर्यंत सुरू ठेवायला सुरूवात केली. तसेच ज्या लोकांना दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी नसतानाही दुकाने सुरू ठेवायला लागली. ही बातमी ई टीव्ही भारतमध्ये लागताच जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले.जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत आज 5 वाजल्यापासून सुरूवातीला दुकाने बंद करण्याचे सूचना घनकचरा गाडीच्या माध्यमातून दिल्या गेल्या. त्यांनंतर पालिका कर्मचारी कारवाईसाठी निघाले. मात्र, दुकान चालकांवर कारवाई करण्यासाठी गेले असतांना हे दुकान मालकांनी अक्षरशः भांडण करायला सुरुवात केली. एवढंच नाही तर त्यांनी एका नेत्याला बोलावून घेतले आणि नेतेही या नियम तोडणाऱ्यांसाठी धावून आले आणि कार्यवाही करू दिली नाही. कर्मचारी कोणतीही कार्यवाही न करता पुढे निघाले. तोपर्यंत 6 वाजले होते. तरी पुन्हा काही दुकाने सुरू होती. त्यांच्यावर कारवाई करायला पोहोचताच काहींनी कर्मचाऱ्यांच्यासमोर दुकान बंद करून निघून गेले. तर एक व्यापारी शेवटपर्यंत भांडण करीत राहिला आणि दंड देणार नाही तुम्हला काय करायचे आहे ते करा असे म्हणून दुकान बंद करून निघून गेला.

या सर्व घटनेनंतर या पालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला की वरिष्ठांच्या आदेशांचे पालन करावे तरी कसे. दुकानदार भांडतात आणि नेते त्यांच्या बाजूने उभे राहून कारवाई करू देत नाहीत. नुकतेच मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या नागरिकांना नियमाचे पालन करण्यास सांगितले आहे. जर नागरिकांनी नियमाचे पालन केले नाही, तर पुन्हा अशी परिस्थिती येऊ शकते असेही त्यांनी सांगितले. मात्र, एवढे असतानाही भंडाऱ्यातील काही व्यापारी नियमांचे पालन करीत नाहीत. या काही लोकांमुळे भविष्यात याचा भुर्दंड इतरांनाही भोगावा लागेल.

Last Updated : Jun 23, 2020, 8:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.