भंडारा - नदीची ( Bhandara river ) पाणी पातळी सतत वाढत असतानाही मासेमारीसाठी ( fishing in Bhandara river ) गेलेले 6 तरुण पुराच्या पाण्यात नदीच्या मधोमध बेटावर अडकल्याची घटना भंडारा ( Bhandara river ) जिल्ह्याच्या पवनी येथील पाथरी येथे घडली आहे. वैनगंगा नदीत ( Wainganga River ) अडकलेल्या या 6 तरुणांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी SDRF चे एक टीम पाचरण करण्यात आली आहे. टीम घटनास्थळी पोहचली असली, तरी काळोख अंधार असल्याने बचाव मोहीम ही सकाळी करण्याचे ठरविण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण रात्र या 6 तरुणांना जीव मुठीत घेऊन काढावी लागली आहे.
दुपारी गेले होते नदीत - मागील 5 दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात सतत पाऊस पडत असल्याने वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदीपात्रात मासेमारी करण्यास जाऊ नये, अशी चेतावणी प्रशासनाने दिल्यानंतरही पवनी तालुक्यातील पाथरीचे गावातील काही तरुण मासेमारी करण्यासाठी वैनगंगा नदीत गेले होते. याच नदी बांधण्यात आलेल्या गोसे धरणाचे 33 ही दार दीड मीटर ने उघडण्यात आले आहे.
व्हिडिओ काढून पाठविला- त्यामुळे नदीपात्रात पाण्याची अधिक वाढ झाल्यामुळे तसेच मुसळधार पाऊस होत असल्याने सदरचे 6 इसम पाथरी येथील नदीच्या मधोमध असलेल्या बेटावर अडकून पडले आहेत. अशा पद्धतींनी नदीत अडकून असल्याचा एक व्हिडिओ त्यांनी काढून पाठविला आहे. सदर इसमांना बाहेर काढण्याकरीता भंडारा जिल्हा शोध व बचाव पथक प्रयत्न करत आहे.
अधिकाऱ्यांची माहिती - मात्र रात्रीचा काळोख असल्याने व नदीचे पात्रात पाणी खुप असल्याने बचाव कार्य करण्यास अडसर निर्माण होत असल्याने बचाव कार्य संथ गतिने सुरु आहे. तसेच सदर इसमाना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी SDRF ची टीम तैनात करण्यात आली आहे. मात्र अंधारामुळे बचाव मोहीम सकाळी सुरू केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तो पर्यंत हे तरुण वरून बसणाऱ्या पावसात भिजत संपूर्ण रात्र नदीच्या मधोमध जीव मुठीत घेऊन ईश्वराकडे स्वतः ला वाचविण्याची विनंती करण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नव्हते.