ETV Bharat / state

भंडाऱ्यात आणखी चार जण कोरोनामुक्त, रुग्णांची संख्या 41 वर - कोरोना विषाणू

जिल्ह्यात शुक्रवारी एक कोरोना बाधित रुग्ण सापडला होता. त्यामुळे जिल्ह्याची बाधित रुग्णांची एकूण संख्या 41 वर गेली होती. मात्र, शनिवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही.

Bhandara Corona News
भंडारा कोरोना बातमी
author img

By

Published : Jun 6, 2020, 7:26 PM IST

भंडारा - शनिवारी जिल्ह्यातील चार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 18 जण कोरोनामुक्त झाले असून 23 लोक उपचार घेत आहेत. तसेच शनिवारी एकही नवीन कोरोनाचा नवीन रुग्ण जिल्ह्यात आढळला नसल्याने प्रशासन आणि नागरिकांच्या दृष्टीने ही समाधानाची गोष्ट आहे.

जिल्ह्यात शुक्रवारी एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यामुळे जिल्ह्याची बाधित रुग्णांची एकूण संख्या 41 वर गेली होती. मात्र, शनिवारी एकही नवीन रुग्ण आढळला नाही. तर उपचार घेत असलेल्या 27 रुग्णांपैकी 4 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता केवळ 23 बाधित रुग्ण जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग असल्याची सौम्य किंवा तीव्र लक्षणे दिसून येतात, अशांना जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर व डेडिकेटेड कोविड रुग्णालय येथील विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात येते. त्यांच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठवले जातात.

आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 305 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी आतापर्यंत 41 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 2 हजार 140 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 124 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

आज 6 जून रोजी आयसोलेशन वार्डमध्ये 26 व्यक्ती दाखल असून आतापर्यंत 348 व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर व मोहाडी येथे 385 जण आहेत. तर 1 हजार 598 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईनमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे, मुंबई व इतर राज्यातून 40 हजार 501 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले आहेत. यापैकी 28 हजार 929 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 11 हजार 572 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी 28 दिवस घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.