ETV Bharat / state

आलिशान गाडीतून फिरून एटीएमधारकांना लुटणाऱ्या 4 आरोपींना अटक; पवनी पोलिसांची कारवाई

या चौघांनी अगोदरही महाराष्ट्रात आणि इतर राज्यात ही अशाच पद्धतीचे कित्येक गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. यांच्याकडून एक फॉर्च्युनर कार, १० बनावट एटीएम कार्ड, ४ मोबाईल, ५० हजार रोख रक्कम, एक एटीएम क्लोन मशीन असे साहित्य जप्त केले आहे.

भंडारा
author img

By

Published : Sep 9, 2019, 11:24 PM IST

भंडारा - महागड्या फॉर्च्युनर गाडीतून फिरून ग्रामीण भागातील लोकांचे एटीएम कार्ड क्लोन करून लाखो रुपये लुटणाऱ्या हरियाणातील चौघांना अटक करण्यात पवनी पोलिसांना यश आले आहे. या चौघांनी अगोदरही महाराष्ट्रात आणि इतर राज्यातही अशाच पद्धतीचे कित्येक गुन्हे केल्याचे उघड झाले आहे. यांच्याकडून एक फॉर्च्युनर कार, १० बनावट एटीएम कार्ड , ४ मोबाईल, ५० हजार रोख रक्कम, एक एटीएम क्लोन मशीन, असे साहित्य जप्त केले आहे.

आलिशान गाडीतून फिरून एटीएमधारकांना लुटणाऱ्या 4 आरोपींना अटक

तुम्ही जर एटीम वापरत असाल तर सावधान... एटीएम वापरताना तुमच्या पाठीमागे जर कुणी उभा असेल तर त्याला पहिले बाहेर काढा. तसेच एटीएमचा वापर करताना काही अडचणी येत असतील तर बँकेच्या कर्मचाऱ्यांना किंवा आपल्या ओळखीच्या व्यक्तींची मदत घ्या, जर कोणी अनोळखी व्यक्ती तुम्हाला मदत करतो म्हणत असेल तर त्याची मदत स्वीकारू नका.

हे सांगण्यामागाचे कारण की, पवनी पोलिसांनी अटक केलेले आरोपी लोकांना मदत करण्याच्या बहाण्याने एटीएममध्ये प्रवेश करून लाखोंचा गंडा घालत होते. पवनी तालुक्यातील कोंढा गावातील महिलेला अशाच अनोळखी व्यक्तीची मदत घेणे ९० हजार रुपयांना महागात पडले. ही महिला एटीएममध्ये गेल्यानंतर आरोपी तिच्या मागे गेले आणि तिला एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत करतो, असे सांगून एकाने तिचा एटीमएम घेत आपल्या सहकाऱ्याकडे दिले. त्याने लगेच ते क्लोन करून एटीएममधून तब्बल 90 हजार काढले. याची तक्रार त्या महिलेने पवनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे आणि बँकांना माहिती देऊन चौकशी सुरू केली. घटनेच्या दिवशी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी या आरोपींना लाखांदूर पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. तसेच त्यांनी बऱ्याच लोकांना गंडा घातला असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

महागड्या गाडीतून फिरणारे हे लोक आरोपी असतील, अशी कोणालाही कल्पनाही येत नव्हती आणि याचाच फायदा आरोपी घेत होते. यासंदर्भातला अधिक तपास पोलीस करत आहेत.

Intro:Body:Anchor :- महागड्या फोर्चूनर गाडीतून फिरून ग्रामीण क्षेत्रातील लोकांनाचे ए टी एम कार्ड क्लोन करून लाखो रुपये लुटणाऱ्या हरियाणातील 4 ठगबाज लोकांना अटक करण्यात पवनी पोलिसांना यश आले आहे. या ठाकबाज लोकांनी या अगोदर ही महाराष्ट्रात आणि इतर ही राज्यात या अश्याच पद्धतीचे कित्येक गुन्हे केल्याचे समोर येत आहे. यांच्या कडून एक फ़ोर्चुनर कार १० डुप्लिकेट एटीएम कार्ड ,४ मोबाईल ,५० हजार रोख , एक एटी एम क्लोन मशीन असं साहित्य जप्त केले आहे.

तुम्ही जर एटीम वापरत असाल तर सावधान तुम्ही एटीएम वापरताना तुमच्या पाठीमागे जर कुणी उभा असेल तर त्याला पहिले बाहेर काढा आणि एटीएम उपयोग करतांना काही अडचणी येत असतील तर बँकेच्या कर्मचाऱ्यांना किन्वा आपल्या ओळखीच्या व्यक्तींची मदत घ्या जर कोणी कुणी अनोळखी इसम तुम्हाला मदत करतो म्हणत असेल तर त्याची मदत स्वीकारू नका.
हे सांगण्यामागाचे कारण की पवनी पोलिसांनी अटक केलेले आरोपी लोकांना मदत करण्याचा बहाण्याने ए टी एम मध्ये प्रवेश करून लाखोंचा गंडा घालत होते. पवनी तालुक्यातील कोंढा गावातील महिलेला अश्याच अनोखी व्यक्तीची मदत घेणे ९० हजार रुपयात पडले. ही महिला ए टी एम मध्ये गेल्यानंतर आरोपी तिच्या मागे गेले आणि तिला ए टी एम मधून पैसे काढण्यासाठी मदत करतो असे सांगून एकाने तिचा ए टीम एम घेत आपल्या सहकार्याने दिले त्याने लगेच ते स्वॅप करून पाहिला व्यक्ती कोड नंबर लक्षात ठेवलं आणि नंतर त्या ए टी एम चा क्लोन करून दुसऱ्या ठिकाणच्या ए टी एम मधून तब्बल 90 हजार काढले, याची तक्रार त्या महिलेने पवनी पोलिसांना दिल्या नंतर पोलिसांनी भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन आणि बँकांना माहिती देऊन चौकशी सुरू केली, घटनेच्या दिवशी सीसी टीव्ही फुटेज च्या साह्याने पोलिसांनी या आरोपीना मोठ्या सीताफिने लाखांदूर पोलिसांच्या मदतीने अटक केली. सध्या हे या आरोपीनाची पवनी पोलीस आणि एल सी बी तपास करीत आहेत. एवढ्या महाग गाडीततून हे फिरत असल्याने अश्या पद्धतीने त्यांनी बऱ्याच लोकांना फसवून कोट्यवधी कमावले असतील असा अंदाज आहे.
महागड्या गाडीतून फिरणारे हे आरोपी असतील अशी कोणालाही कल्पनाही येत नाही आणि याचाच चांगला फायदा हे आरोपी घेत होते, एका ठिकाणी अपराध केल्या नंतर तिथून ते पळ काढायचे त्यामुळे अजून पर्यंत त्यांना पकडले गेले नोव्हेते या लोकांनी अजून कुठे कुठे असे अपराध केले आहेत किती लोकांना फसविले आहे याचा तपास पोलीस घेत आहेत.

BYTE :- अरविंद साळवे पोलिश अधीक्षक भंडारा Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.