भंडारा - गुरुवारी भंडारा जिल्ह्यात केवळ तीन हजार लस उपलब्ध असून, शुक्रवारी पुन्हा 24 हजार नवीन लस जिल्ह्याला मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री विश्वजित कदम यांनी दिली आहे. ते गुरुवारी भंडारा जिल्ह्यात कोरोना विषयी आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी ही माहिती दिली.
लसींचा तुटवडा पडू देणार नाही -
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लसींची कमतरता निर्माण झाली असून भंडारा जिल्ह्यातही गुरुवारी फक्त शेवटचे तीन हजार लस उपलब्ध आहेत. मात्र शुक्रवारी लसीकरण थांबणार नाही कारण शुक्रवारी पुन्हा 24,000 नवीन लसीचे डोस जिल्ह्याला उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे. आरोग्य मंत्र्यांशी बोलून पुढच्या चार दिवसात जास्तीत जास्त लस भंडारा जिल्ह्यासाठी उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. 45 वयोगटातील वरच्या लोकांना लोकसंख्येच्या तुलनेत 30 टक्के लसीकरण भंडारा जिल्ह्यात झालेले आहे. महाराष्ट्रात भंडारा जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत अग्रेसर आहे. लसीचा तुटवडा संपूर्ण देशात आहे महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात तुटवडा आहे. महाराष्ट्राला लागणारे जास्तीत जास्त लस केंद्राने द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
नागपूरजवळ असल्याने होत आहे उद्रेक-
भंडारा जिल्ह्यात कोरोनाच्या उद्रेक झाल्यानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी भंडारा जिल्ह्यात आढावा बैठक घेतली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन कोरोना विषयीची संपूर्ण माहिती घेतली. नागपूर हा भंडारा जिल्ह्याच्या अगदी जवळ असल्याने नागपूर प्रमाणे भंडारा जिल्ह्यातही कोरोणाचा उद्रेक होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - 'लसीचा केवळ दीड दिवस पुरेल एवढाच साठा, ५-६ दिवसांत ऑक्सिजनची कमतरता भासेल'
बेड आणिऑक्सिजनचा तुटवडा होणार नाही.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा सध्या उद्रेक होत आहे. दररोज 800च्या वर रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा वर त्याचा दबाव होत आहे . मात्र असे असले तरी रुग्णांना बेडची उपलब्धता अजून आहे आणि पुढेही राहणार यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच रुग्णांना लागणारा ऑक्सिजन याचाही तुटवडा होऊ नये यासाठीही प्रयत्न केले जाणार असल्याचे विश्वजीत कदम यांनी सांगितले.
नागरिकांना केली विनंती
कोरोनाचा प्रादूर्भाव थांबवायचा असेल तर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर निघू नये. मास घालाव आणि त्याचा वापर करावा आणि सोशल डिस्टंसिंग पाडावा तरच आपण हि चेन कुठेतरी ब्रेक करू शकतो त्यामुळे नागरिकांनी आत तर अधिक कडक पद्धतीने नियम पाळावे अशी विनंती यावेळी पालकमंत्री विश्वजीत कदम यांनी केली.
व्यापाऱ्यांचे नुकसान करण्यासाठी नाही तर चैन ब्रेक करण्यासाठी घेतला निर्णय.
व्यापारी हे आमचाच एक हिस्सा आहे त्यांचा नुकसान व्हावा असा मी कधी विचार करणार नाही. मात्र कोरोनाची ही चेन ब्रेक व्हावी यासाठी हा निर्णय घेतलेला आहे. सध्या व्यापारी वर्गाशी चर्चा सुरू असून येत्या काळात नवीन पद्धतीने किंवा वेळ कमीजास्त करून कशा पद्धतीने हे दुकान सुरू करता येतील यावर विचार सुरू असून येत्या 2-3 दिवसात त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेतल्या जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - 'रेमडेसिवीर' तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांकडून उत्पादकांची बैठक