बीड - 'मी खरं प्रेम केलं . . आज तुला सोडून जात आहे ' अशा मजकुराची सुसाईड नोट लिहून 22 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी पहाटे माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे घडली आहे. मनिष गणेश घुले ( वय 22 रा . किट्टीआडगाव ता. माजलगाव) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. त्याने एका लिंबाच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली.
मनिषच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली. त्यामध्ये मित्राला उद्देशून लिहलं आहे की , ' मी जीवनाला कंटाळलो आहे. माझ्या आईला सांभाळा. माझ्या नावावरील एक एकर जमीन बहिणीला द्या . . अर्धा एकर माझा मित्राला द्या. सावता रासवे, मित्रा तू माझ्या आईला सांभाळ. मी तुझ्यावर खरं प्रेम केलं . . . मी तुला आज सोडून जात आहे.'' असे या चिठ्ठीमध्ये लिहिले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास माजलगांव पोलीस करत आहेत . या प्रकरणी माजलगांव ग्रामीण पोलीसात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास बी. ए. पवार हे करत आहे . या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.