ETV Bharat / state

धक्कादायक : फेसबुकवरील मैत्रिणीच्या त्रासाला वैतागून 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

author img

By

Published : Dec 9, 2020, 9:29 AM IST

फेसबुकवर केलेली मैत्री एका तरुणाला महागात पडली. त्याच्यामागे महिलेने लग्नाचा तगादा लावला. त्याच्या त्रासातून मुक्ततेसाठी शेवटी तरुणाने आत्महत्या केली.

धक्कादायक: फेसबुक वरील मैत्रिणीच्या त्रासाला वैतागून 25 वर्षीय तरुणाची आत्महत्या

बीड - सहा महिन्यापूर्वी फेसबुकवर एका मुलीची झालेली ओळख अगोदर मैत्रीत व नंतर प्रेमात रुपांतरीत झाली. मात्र काही दिवसानंतर महिलेने तरुणाला लग्नासाठी गळ घातली. जमीन व ट्रक नावावर कर म्हणून तगादा लावला. त्या तरुणीचा जाच इतका वाढला की, पंचवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना 4 डिसेंबरला समोर आली. याप्रकरणी मंगळवारी धारूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्यामध्ये संबंधित महिलेसह मयताच्या एका मित्रावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद झाला.

फेसबुकच्या माध्यमातून मैत्री आणि प्रेम

दीपक सुभाष सांगळे (२५, रा.कासारी फाटा, ता. धारुर) असे मयत तरुणाचे नाव आहे. ४ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता धारुर शहराजवळील एका शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन त्याने आत्महत्या केली होती. ही बाब ५ डिसेंबरला सकाळी निदर्शनास आल्यावर एकच खळबळ उडाली होती. मयत दीपक हा अविवाहित होता. स्वत:च्या मालकीचा ट्रक चालवून तो कुटुंबाला हातभार लावत असे. तर या प्रकरणाची त्याची विवाहित बहीण शीतल दिगांबर घुगे (रा. चिंचपूर ता.धारुर) यांनी मंगळवारी धारुर ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, मयत दीपक याची आरती या पुणेस्थित विवाहित महिलेशी फेसबुवर सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरतीने त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर माझ्याशी लग्न कर, शेती व ट्रक नाावर कर' असे म्हणून तिने त्यास मानसिक त्रास दिला. तिच्या सततच्या त्रासास कंटाळून दीपकने आत्महत्येचे पाऊल उचलले. आरतीला मयत दीपकचा मोबाइल क्रमांक उपलब्ध करुन दिल्याने त्याचा मित्र ज्ञानेश्वर उर्फ वाघ्या बाबासाहेब मुर्गीकर (रा. धारुर) यालाही गुन्ह्यात सहआरोपी करण्यात आले. उपनिरीक्षक प्रदीप डोलारे अधिक तपास करत आहेत.
प्रकरणातील मोबाइल पोलिसांनी केले जप्त -
या प्रकरणात आरोपी महिलेच्या पूर्ण नावाचा उल्लेख नाही. तिची ओळख पटविण्यासाठी मयत दीपक सांगळे व त्याचा मित्र ज्ञानेश्वर मुर्गीकर या दोघांचे मोबाइल ताब्यात घेतले आहेत. त्यावरुन आरोपी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू असून अधिक तपास सुरू असल्याचे उपनिरीक्षक प्रदीप डोलारे यांनी सांगितले.

हेही वाचा - राज्यात सहा हजार शिक्षक पदांसाठी होणार भरती

हेही वाचा - 'केंद्र सरकाची भूमीका एखाद्याला लुटून, मारुन निघून जाणाऱ्या डाकूप्रमाणे' - बच्चू कडू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.