ETV Bharat / state

World Disabled Day : दिव्यांग मंत्रालय झालं पण समस्या सुटणार का?; वाचा दिव्यांगांची व्यथा - World Disabled Day

बीड जिल्ह्यातही आज दिव्यांग दिन साजरा करण्यात ( World Disabled Day ) आला. दिव्यांगांच्या समस्यांचा पाढाच वाचण्यात आला. पाहा ईटीव्ही भारतचा एक स्पेशल रिपोर्ट.

World Disabled Day
दिव्यांगांची व्यथा
author img

By

Published : Dec 3, 2022, 6:54 PM IST

बीड : आज जागतिक दिव्यांग दिन साजरा केला जात ( World Disabled Day ) आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात ( Organized various events ) येतात. दिव्यांगांच्या कल्याणाच्या विविध योजनांची यानिमित्ताने घोषणा करण्यात ( welfare schemes for Disables ) येते. हे सर्व दरवर्षी होत असते. मात्र या घोषणा नंतर हवेतच विरतात असे दिसते. बीड जिल्ह्यातही आज दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. यावेळी मात्र दिव्यांगांच्या समस्यांचा पाढाच वाचण्यात आला. पाहूयात याविषयीचा ईटीव्ही भारतचा एक स्पेशल रिपोर्ट.

दिव्यांगांची व्यथा

5% टक्के निधीचे वाटप केले जात नाही : यामध्ये असे दिसून आले की, अनेक ग्रामपंचायत कार्यालयाच्या स्वउत्पन्नातील 5% टक्के निधीचं वाटप केलं जात नाही. काही नगरपंचायतीसुद्धा शहरातील दिव्यांगांना 5% टक्के निधी वाटप करत नसल्याच्या तक्रारी दिव्यांगांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत. परंतू त्याची कसलीही दखल शासन दरबारी घेतली जात नाही, असे सांगण्यात आले. दिव्यांगांना अंत्योदय योजने अंतर्गत रेशन मिळत नसल्याच्या तक्रारीही त्यांनी पुरवठा विभागाला केल्या आहेत. त्याचबरोबर शासनाकडून दिले जाणार मानधनही त्यांना वेळेवर मिळत नाही. यावर उपाय म्हणून सरकारचेही प्रयत्न सुरू आहेत. महाराष्ट्र सरकारने दिव्यांगाचं वेगळं मंत्रालय स्थापन करण्याची घोषणा केली आहे. आता हे मंत्रालय झाल्यानंतर तरी दिव्यांगाच्या समस्या सुटतील का असाच प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

ग्रॅज्युएट असूनही उपजिविकेचे साधन नाही : उपजिविकेचे साधन नाही येथे कार्यक्रमानिमित्त आलेल्या एकाने सांगितले की, ते ग्रॅज्युएट झाले आहे. मात्र उपजिविकेचे साधन नाही. त्यांचे गाव नेकनूर असून ग्रामपंचायतीच्या निधीतला 5% निधी आम्हाला त्यांना दिला जात नाही. फक्त सहानुभूती दाखवली जाते मात्र कोणतीच अ‍ॅक्शन घेतली जात नाही, अशी तक्रार त्यांनी केली. मात्र दिव्यांग मंत्रालय स्थापन झाल्यावर तरी त्यांच्या समस्या सुटतील अशी त्यांना आशा आहे. कारण या अगोदर दिव्यांग महामंडळ होतं. तिथेही फक्त कामं होतील अशी उत्तरंच दिली जात होती. कामं होत नव्हती, अशी खंत दिव्यांग व्यक्त होत आहेत. शेवटी या दिव्यांगांची सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की जसं मंत्रालय स्थापन करत आहेत, तसे कार्य पण करा व आमच्या सगळ्या समस्या सोडवाव्यात याच्यामध्ये आम्हाला मध्यस्थीची गरज पडू नये. यावेळी त्यांनी बँकेत फाईल गेलेल्या प्रकरणाचा दाखला दिला. ज्या बँकेत फाईल घेऊन गेले तेव्हा बँकेत सांगितले गेले की त्यांची अगोदरच दोन प्रकरण येऊन या ठिकाणी पडलेले आहेत. ब्युरो रिपोर्टसह ईटीव्ही भारत बीड.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.