परळी - वैद्यनाथ साखर कारखाना मागील काही दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दरम्यान बंद काळात थकलेल्या वेतनाची मागणी कर्मचाऱ्यांकडून सुरू असून, आज काही कर्मचाऱ्यांकडून कारखान्यामध्ये गोधंळ घालण्यात आल्याची घटना घडली आहे.
कर्मचाऱ्यांनी वजन काटा केला बंद
कारखान्याचे एमडी औरंगाबादला गेल्याची संधी साधून, काही कर्मचाऱ्यांनी आज वजन काटा बंद करत गोंधळ घातला. कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. सध्या साखर कारखाना आर्थिक संकटात सापडला आहे. अशा आर्थिक संकटात सर्वांनी मिळून काम करण्याची अपेक्षा असते, मात्र काही कर्मचारी जाणीवपूर्वक गोंधळ घालत असल्याची प्रतिक्रिया संचालक शिवाजीराव गुट्टे यांनी दिली आहे.