ETV Bharat / state

International Womans Day 2023: महिला दिन विशेष; दोनशे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारी महिला - 200 women In Beed

बीड जिल्ह्यामध्ये अनेक महिला या कर्तबगार महिला म्हणून पाहिल्या जातात. अनेक वेळा पाहतो की, कोणत्याही व्यवसाय उद्योगांमध्ये जर महिलांनी लक्ष दिले तर तो उद्योग व्यवसाय नक्कीच नावारूपाला येतो. गीता कदम या बीड शहरासह शहराच्या बाहेरही जवळपास 200 महिला एकत्र करून प्रत्येक महिलेला त्यांच्या आवडीप्रमाणे व्यवसाय उभा करून देण्याचे काम महिला बचत गटाच्या माध्यमातून केले आहे. याविषयीचा ईटीव्ही भारतचा एक स्पेशल रिपोर्ट.

Geeta Kadam
गीता कदम
author img

By

Published : Mar 4, 2023, 10:25 AM IST

दोनशे महिलांना रोजगार उपलब्ध करून देणारी महिला

बीड: गीता कदम यांनी सांगितले की, त्याच्याकडे महिलांचे सहा बचत गट आहेत. बचत गटांमध्ये पावणे दोनशे महिला आहेत. प्रत्येक महिलेची बचत ही प्रत्येक महिन्याला 1 हजार रुपये आहे. या बचत गटाची सुरुवात 2014 मध्ये केली आहे. घरामधून त्याच्या पतीने त्यांना पूर्ण प्रतिसाद दिला आहे. म्हणून त्या आज बचत गटाचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकतात. पहिला मला बचत गट कसा चालू करायचे हे माहित नव्हते. परंतु मी पहिल्याच वेळेस 14 महिलांना एकत्र करत बचत गटाची सुरुवात केली. बचत गट कसा चालवला जातो याची पूर्ण माहिती घेतली. माझ्या घरच्या मंडळींनी सांगितले की, तुला व्यवसाय करायचा आहे. त्याची माहिती तूच घ्यायची जेणेकरून तुला त्याच्यामध्ये प्रगती करता येईल. अवताडे नावाच्या एका महिलेने मला पूर्ण माहिती दिली. जवळपास तीन वर्षात चौदा महिलांचा एक गट चालवला. त्यानंतर मी प्रत्येक रुपयाचा हिशोब हा महिलांना व घरातही देत आहे.

दोनशे महिलांचे सहा बचत गट: आपण जे काम करत आहोत ते समाजातील लोकांना माहिती झाले पाहिजे. प्रत्येकाला माहिती झाली पाहिजे. त्यामुळे माझ्यावर अनेक महिलांनी विश्वास टाकला. आधुनिकतेच्या जगामध्ये कम्प्युटरला फार महत्त्व आहे. याच कम्प्युटरच्या माध्यमातून सर्व व्यवहार कॅम्पुटर केले जातात. एक वर्षाची होणारी बचत ही प्रत्येक महिलेला वाटून दिली जाते. संपूर्ण व्यवहार पाहून अनेक महिलांनी माझ्यावर विश्वास टाकला व 14 महिलांचा आता जवळपास पावणे दोनशे महिलांचे सहा बचत गट तयार झाला आहे.

माझ्या कामाचे यश आहे: सर्वजण घरामध्ये एक हजार रुपये ठेवतात. पण ते पैसे वाढत नाहीत. तुम्ही जर ते बचत गटामध्ये गुंतवले तर आपल्याला अनेक येणाऱ्या अडचणी व उद्योगासाठी लाखो रुपये देईल असे बोलल्यानंतर अनेक महिलांचा त्याच्यावर विश्वास बसला. बघता सहा महिला बचत गट तयार झाले. प्रत्येक महिन्याला बचत गटाचा कारभार 5 लाखापर्यंत पोहोचतो. वसुलीची पद्धत अशी आहे की, ज्या दिवशी बचत गटाची मिटींग असते त्याच दिवशी बचत व व्याज त्याच दिवशी 80 टक्के महिला जमा करतात. त्याच्यासोबत ज्या महिला काम करत आहेत. त्या एवढ्या छान आहेत की, त्या प्रत्येक महिला त्याच्या हाकेला आवाज देत असतात.

आयुष्यातली खरी अचिव्हमेंट: अनेक महिलांचे त्यांनी छोटे-मोठे उद्योग उभे केले आहे. एखाद्या महिलेला ज्यावेळेस गरज असते त्या महिलेच्या गरजेप्रमाणे पन्नास हजारापासून एक लाखापर्यंत जो चेक पास होतो. त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान असते तीच खरी आयुष्यातली खरी अचिव्हमेंट आहे असे त्या सांगतात. महिलांना लागणारी मदत ही त्यांना वेळेमध्ये होते. बचत गटामध्ये कुठलाही प्रोसिजर खर्च म्हणून घेतला जात नाही. एखाद्या महिलेने पन्नास हजार रुपये घेतले तर पूर्णची पूर्ण रक्कम ही त्या महिलेच्या खात्यामध्ये जमा होते. यामध्ये सरळव्याज पद्धती असल्याने महिलांना व्याज भरण्यासही परवडत आहे. विशेष म्हणजे त्यांनी भरलेली बचत ही त्यांची बचत म्हणून आमच्याकडे आर्थिक व्यवहारात फिरवली जाते. इतर बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांकडून पैसे घेतले जात असल्याचेही तक्रारी आल्या मात्र, आमच्या बचत गटामध्ये असले कुठल्याही प्रकारची चार्ज घेतले जात नाही. तुम्ही काही तरी व्यवसाय करा मी पैसा तुम्हाला उभा करून देते, त्याच्या माध्यमातून येणाऱ्या उत्पन्नातून तुमच्या घराला हातभार लावा. नुसती बचत करूनच माणसाची प्रगती होत नाही, आजगटातील महिलांकडे रोज पैसा येणारे व्यवसाय त्यांना उभा करून दिला आहे. त्यांनी केलेल्या व्यवसायातून त्यांची आर्थिक प्रगती होत आहे. म्हणून महिलांनी व्यवसाय चालू करा असे गीता कदम सांगतात.

हेही वाचा: Rakshasbhuvan Shani Temple राक्षसभुवनचा शनी करतो लोकांची साडेसाती दूर जाणून घ्या काय आहे वैशिष्ट्ये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.