बीड - सांगलीतून केज तालुक्यातील डोका येथे आत्याच्या वर्षश्रद्धासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला आहे. संबंधित घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
मीरा बाबुराव रंधवे या सांगलीत कुटुंबासोबत वास्तव्य करत होत्या. आत्याच्या श्राद्धासाठी केज तालुक्यातील डोका येथे त्या आल्या होत्या. २४ नोव्हेंबर रोजी शहरातील एका दुकानातून कपडे खरेदी करून रात्री डोका येथे घरी जात असताना रस्त्यात अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. तसेच मृताची ओखळ पटू नये, यासाठी चेहरा व डोकं ठेचण्यात आलंय. घटनास्थळावर पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे, अशोक नामदास, पोलीस जमादार अमोल गायकवाड यांनी पोहोचत तपासणी केली.
बीड : केज तालुक्यात महिलेचा खून ; अज्ञाताने घातला डोक्यात दगड
केज तालुक्यातील डोका येथे आत्याच्या वर्षश्रद्धासाठी आलेल्या एका ४० वर्षीय महिलेचा अज्ञात व्यक्तीने डोक्यात दगड घालून खून केला आहे. संबंधित घटना बुधवारी उघडकीस आली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.