ETV Bharat / state

मेहबूब शेख यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घ्या; राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन

author img

By

Published : Dec 30, 2020, 7:55 PM IST

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा या मागणीचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले. हा गुन्हा मागे घ्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

mahebub shekh
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे निवेदन

बीड - औरंगाबाद सिडको पोलीस ठाण्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा या मागणीचे निवेदन तहसिलदार शारदा दळवी व पोलिस निरीक्षक सलीम चाऊस यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने बुधवारी निवेदन देण्यात आले.

महेबुब शेख यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या या खोट्या गुन्ह्याचा जाहीर निषेध करत, हा गुन्हा रद्द करण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला.

तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनावर युवा नेते महेश आजबे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नाजीम शेख, डॉ सुनील पारखे, अशोक पोकळे, भाऊसाहेब घुले, डॉ. अशोक सरोदे, राजेंद्र जरांगे, ताराचंद कानडे, डॉ. संतोष काकडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद येथील एका तरुणीला मुंबईत नोकरी लावतो म्हणून मेहबूब शेख यांनी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करत या तरुणीने औरंगाबाद येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाचा तपास औरंगाबाद पोलीस करत असून महबूब शेख यांनी सदरील महिलेच्या आरोपाचे खंडन केले आहे.

हेही वाचा - २०२० : सर्वाधिक कमाई 'तान्हाजी' आणि 'बागी ३' ची, १०० कोटी क्लबमध्ये केवळ २ सिनेमे

औरंगाबाद येथे गुन्हा दाखल झाल्यानंतर मेहबूब शेख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रकार केला जात आहे. या प्रकरणाशी माझा कुठलाही संबंध नाही. सुड बुद्धीने माझ्यावर गुन्हा दाखल करून माझे राजकीय भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा डाव आखला जात आहे. याची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.