ETV Bharat / state

'या' कारणांमुळे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्याच्या चकलंबा येथील जिल्हा परिषद शाळा ही जिल्ह्याची सर्वाधिक पटसंख्या असलेली शाळा आहे. असे असूनही इयत्ता नववी आणि दहावीसाठी विज्ञान आणि गणित या विषयासाठी मागील चार ते पाच वर्षांपासून शिक्षक नाही. सतत मागणी करूनही शिक्षकाची नियुक्ती होत नाही म्हणून येथील गावकऱ्यांनी शाळेला कुलूप ठोकले आहे. जोपर्यंत शिक्षक येत नाही तो पर्यंत कुलूप काढणार नाही, असा पवित्रा चकलंबावासीयांनी घेतला आहे.

शाळेला कुपूल ठोकताना ग्रामस्थ
author img

By

Published : Jul 6, 2019, 10:10 PM IST

बीड - जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ग्रामस्थांनी आज (शनिवारी) कुलूप ठोकले. इयत्ता नववी व दहावी या वर्गाच्या विज्ञान आणि गणित या विषयासाठी मागील चार-पाच वर्षांपासून पात्रताधारक शिक्षक नियुक्त नाहीत. यामुळे विद्यर्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकले आहे.

विशेष म्हणजे चकलंबा येथील ही शाळा बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा आहे. या शाळेची पटसंख्या ९७० असून यात विद्यार्थ्यांची संख्या ४६६ तर विद्यार्थिनींची संख्या ५०४ आहे. विद्यार्थ्यांचे प्राथमिक वर्गांसाठी आणखी प्रवेश चालू आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे या शाळेकडे कायम दुर्लक्ष होत आहे. आतापर्यंत या शाळेला कुठल्याच भौतिक सुविधा मिळालेल्या नाहीत. मागील २ वर्षांपासून ग्रामस्थांनी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षणाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अनेकदा निवेदने दिलेली आहेत. असे असतानाही चकलांबा येथील शाळेला शिक्षक मिळालेले नाहीत जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आमच्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

या शाळेमध्ये सेवकांची ४ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त एका पदावर शिक्षण सेवक कार्यरत आहे तर इतर तीन पदे रिक्त आहेत. या शाळेमध्ये पटसंख्या जास्त असल्यामुळे एकंदरीत १८ तुकड्या आहेत. या सर्व तुकड्या सांभाळणे व शाळेचे इतर कामकाज करणे अशक्य आहे. या सर्व बाबी विचारात घेतल्या असता शिक्षकांची व सेवकाची या शाळेतील रिक्त पदांवर नियुक्ती होणे अत्यावश्यक आहे.

चकलांबा हे बीड जिल्ह्याच्या सीमेवर व नगर जिल्ह्यांच्या लगत असलेले गाव, यामुळे या शाळेवर येण्यास शिक्षक इच्छुक नाहीत. शिक्षकांची इच्छा असेल तरच ते या शाळेवर नियुक्त होऊ शकतात. अन्यथा आम्ही तसा आदेश किंवा सक्ती त्यांना करू शकत नाहीत, असे प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सांगितले. या सर्व बाबी विचारात घेऊन ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरल्या शिवाय कुलूप काढणार नाहीत, या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम आहेत. या सगळ्या वादात चकलंबा येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

Intro: या कारणांमुळे ग्रामस्थांनी जिल्हा परिषद शाळेला ठोकले कुलूप

बीड- जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळा ग्रामस्थांनी शनिवारी कुलूप ठोकले.
इयत्ता नववी व दहावी या वर्गाच्या विज्ञान आणि गणित या विषयी करीता मागील चार-पाच वर्षांपासून पात्रताधारक शिक्षक नियुक्त नाहीत. यामुळे विद्यर्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत ग्रामस्थांनी शनिवारी शाळेला कुलूप ठोकले आहे

विशेष म्हणजे चकलंबा येथील ही शाळा बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा आहे. या शाळेची पटसंख्या 960 असून विद्यार्थ्यांचे प्राथमिक वर्गा करीता आणखी प्रवेश चालू आहेत. विद्यार्थ्यांची संख्या 466 तर विद्यार्थिनींची संख्या 504 आहे. बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे या शाळेकडे कायम दुर्लक्ष होत आहे आतापर्यंत या शाळेला कुठल्याच भौतिक सुविधा मिळालेल्या नाहीत. मागील दोन वर्षांपासून ग्रामस्थांनी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी शिक्षणाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अनेकदा निवेदने दिलेली आहेत. असे असतानाही चकलांबा येथील शाळेला शिक्षक मिळालेले नाहीत जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आमच्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे

या शाळेमध्ये सेवकांची चार पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त एका पदावर शिक्षण सेवक कार्यरत आहे. तीन पदे रिक्त आहेत. या शाळेमध्ये पटसंख्या जास्त असल्यामुळे एकंदरीत 18 तुकड्या आहेत. या सर्व तुकड्या सांभाळणे व शाळेचे इतर कामकाज करणे, हे अशक्य आहे. या सर्व बाबी विचारात घेतल्या असता शिक्षकांची व सेवकाची या शाळेतील रिक्त पदांवर नियुक्ती होणे अत्यावश्यक आहे.

चकलांबा हे बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर व नगर जिल्ह्यांच्या लगत असलेले गाव यामुळे या शाळेवर येण्यास शिक्षक इच्छुक नाहीत. शिक्षकांची इच्छा असेल तरच ते या शाळेवर नियुक्त होऊ शकतात. अन्यथा आम्ही तसा आदेश किंवा सक्ति त्यांना करू शकत नाहीत. असे प्रत्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सांगितले. या सर्व बाबी विचारात घेऊन ग्रामस्थांनी शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे भरल्या शिवाय कुलूप काढणार नाहीत या भूमिकेवर ग्रामस्थ ठाम आहेत. या सगळ्या वादात चकलंबा येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.