ETV Bharat / state

panchaleshwar Aatmatirth Mandir: जगाच्या पाठीवरचे श्री दत्तात्रय प्रभू यांचे भोजन स्थान, वाचा श्री दत्तात्रेय प्रभूंची आख्यायिका

बीड जिल्हा हा अनेक देव देवतांचा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. बीड जिल्ह्याच्या उत्तर सीमेवरून गोदावरी नदी वाहते. या गोदावरी नदीच्या तीरावर अनेक देवतांचे वास्तव्य पूर्वीच्या काळी असल्याचे पुरावे आजही आहेत. बीड जिल्ह्यात श्री दत्तात्रय प्रभू यांचे जगाच्या पाठीवर कुठेही नसलेले भोजन स्थान बीडच्या गेवराई तालुक्यातील पांचाळेश्वर या गावांमध्ये आहे. श्री दत्तात्रय प्रभू हे दुपारी बारा वाजता या ठिकाणी भोजनासाठी थांबतात व चार वाजेपर्यंत विश्रांती घेतात. तसेच पुढे मार्गस्थ होतात अशी आख्यायिका आहे. जाणून घेऊया याविषयीचा स्पेशल रिपोर्ट.

author img

By

Published : Mar 2, 2023, 10:08 AM IST

panchaleshwar Aatmatirth Mandir
श्री दत्तात्रेय प्रभूंची आख्यायिका
पहा श्री दत्तात्रेय प्रभूंची आख्यायिका

बीड: पांचाळेश्वर हे गाव श्री दत्तात्रेय प्रभूंचे भोजन स्थान म्हणून ओळखले जाते. दत्तात्रय प्रभू यांचा चार युगामध्ये अवतार आहे. श्री दत्तात्रय प्रभू यांचा दिनक्रम ठरलेला आहे. दत्तात्रेय प्रभू हे भारगाव कन्येच्या आग्रहास्तव कोल्हापूरला भिक्षेसाठी जातात, भिक्षा स्वीकारून पुढे प्रवास करतात. दुपारी 12 वाजता या ठिकाणी नित्यनेमाने पांचाळेश्वर या ठिकाणी भोजन स्वीकारतात. एक ते चार या वेळेमध्ये ते दत्त गुंफा येथे आराम करतात. त्यानंतर ते माहूर गडावर निद्रेसाठी दररोज जातात. जोपर्यंत हे पृथ्वी चक्र चालू आहे तोपर्यंत श्री दत्तात्रय प्रभू यांचा दिनक्रम असाच चालू राहणार आहे. यामध्ये कुठलाही बदल आतापर्यंत झालेला नाही आणि होणारही नाही.

पंचाळेश्वर स्थानाचे महत्त्व: श्री दत्तात्रेय प्रभू यांचा अभोग सिद्ध अवतार आहे. दत्तात्रय प्रभू यांचे दर्शन होता क्षणी त्या जीवाचा उद्धार होतो. त्या जीवाला मोक्ष मिळतो. हा अवतार गोदावरीच्या पात्रामध्ये पांचाळेश्वर या ठिकाणी हे भोजना स्थान आहे. या ठिकाणी श्री दत्तात्रेय प्रभू यांचे भक्ती करणारे लोक महाराष्ट्रासह भारतातूनही या ठिकाणी दर्शनासाठी व मनोभावे पूजा करण्यासाठी येतात.

दत्तात्रेय प्रभू यांचे जेवण: दत्तात्रेय प्रभू यांचा जेवनामध्ये त्यांच्या आवडीचे पदार्थ पान, सुपारी, नारळ, केळी, सेफ, डाळिंब, मोसंबी असा विडा तयार करून दत्तात्रय प्रभू यांना समर्पित केला जातो. मनामध्ये असलेल्या इच्छा आकांक्षा आणि अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या जातात. हे दत्तात्रय प्रभू यांचे अनेक वर्षापासून नव्हे तर अनेक युगानुयुगे हा दिनक्रम चालू आहे. जगाच्या पाठीवर हे एकमेव ठिकाण म्हणजे, श्री क्षेत्र पांचाळेश्वर भोजन स्थान आहे. या ठिकाणी असणारे जे भक्त लोक येतात यांना ज्या काही शारीरिक व्याधी, अडीअडचणी आहेत त्या याठिकाणी श्री दत्तात्रय प्रभू हे सोडवता.

पांचाळेश्वर नावामागची आख्यायिका: बाजूलाच राक्षस भुवन हे‌ क्षेत्र आहे. शनीच्या साडेतीन पीठ पैकी एक अर्धपीठ म्हणून ओळखले जाते. या ठिकाणी राहणारे पूलस्थी नावाचे एक ब्राह्मण होते. त्यांना चार मुले होती. राजाळ, तेजाळ, कुंभ आणि निकुंभ यामधील कुंभ आणि निकुंभ यांनी घोर तपश्चर्या करून महादेवाचा एक वर प्राप्त केला. पृथ्वीतलावर जे आयुध आहेत म्हणजे शस्त्र असे आहेत. त्या कुठल्याच शस्त्रसराने आम्हाला मृत्यू नाही असा वर त्यांनी महादेवाकडून प्राप्त करून घेतला. त्या मिळालेल्या वरामधून जे त्यांनी चांगले कार्य करण्या ऐवजी त्यांनी इतर लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली.

असे नाव पडले: पंचाळेश्वर या ठिकाणी पूर्वीच्या काळी दंड कारण्यात येत होते. या ठिकाणी आत्मक नावाचे ऋषी या ठिकाणी वास्तव्यास होते. ते श्री दत्तात्रय प्रभू यांचे भक्त होते. त्यावेळेस कुंभ आणि निकुंभ यांनी आत्मकऋषी यांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्रास एवढा भयंकर वाढला की, त्यांना सहन झाला नाही. या ठिकाणी पांचाळ नावाचा राजा राज्य करत होता. राजाकडे आत्मकऋषी गेले आणि त्यांनी सांगितले की, मला हे कुंभ आणि निकुंभ हे त्रास देत आहेत. हे सर्व ऐकून राजाने कुंभ आणि निकुंभ यांच्याबरोबर युद्ध करण्याचे ठरवले. परंतु युद्धात पांचाळ राजाचे अनेक सैनिक मारले गेले व कुंभ आणि निकुंभ हे तर महादेवाने दिलेल्या वराप्रमाणे हे जिवंत असायचे. मग पांचाळ राजा अडचणीत सापडला व शेवटी आत्मक ऋषीच्या भेटीला गेला. मी आता यांना शरण जात आहे. आता मी काय करू, हे मला कळत नाही. त्यावेळेस आत्मकऋषींनी सांगितले की, तुम्ही शांत व्हा मी तुमच्या शंकांचे निवारण करतो. दत्तात्रय प्रभू यांनी त्यांना मदत केली आणि पांचाळ राजा युद्ध जिंकला. तेव्हापासून या गावाचे नाव पांचाळेश्वर व श्री दत्तात्रय प्रभू यांचे भोजन स्थान म्हणून ओळखले जाते.

हेही वाचा: Hanuman Mandir Beed मराठवाड्यातील सर्वात उंच हनुमान नायगाव अभयारण्यातील 41 फूट हनुमानाची सर्वदूर ख्याती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.