बीड - विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे यांनी गुरुवारी संत नगद नारायण स्वामी यांचे समाधी स्थळ, नारायण गड येथे नारळ फोडून व पुढे भगवान गडावर जाऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![beed](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-bid-04-vanchitaaghadi-7204030_09102019143259_0910f_1570611779_556.jpg)
यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना अशोक हिंगे म्हणाले की, बीड विधानसभा मतदारसंघात मागील पंधरा वर्षात प्रस्थापित नेते विकास करू शकले नाहीत. जनतेला भूलथापा देणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना जनताच जागा दाखवेल, असे सांगत अशोक हिंगे पुढे म्हणाले की, विकासाची गंगा वंचित बहुजन व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम येणाऱ्या काळात प्रकाश आंबेडकर करणार आहेत. त्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी जनतेने उभे राहावे, असे आवाहन उमेदवार अशोक हिंगे यांनी केले. यावेळी बीड विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा - बीडमध्ये शेख शफीक औरंगाबादची पुनरावृत्ती करणार - ओवैसी
वंचित बहुजन आघाडीने बीड विधानसभा मतदारसंघात अशोक हिंगे यांची उमेदवारी देऊन राजकीय समीकरणे बदलली आहेत. अशोक हिंगे यांचे मराठा समाजासाठीचे काम अनेक वर्षांपासून आहे. याशिवाय बीड जिल्ह्यातून निघालेल्या मराठा मोर्चाचे समन्वय समितीमध्ये त्यांनी काम केलेले आहे. या कामाचा अशोक हिंगे यांना किती लाभ होईल हे पाहण्यासाठी थोडा वेळ जावा लागणार आहे.
हेही वाचा - जयदत्त क्षीरसागरांसाठी पंकजा मुंडे मैदानात, लोकसभेच्या मदतीची करणार परतफेड