परळी(बीड) -आरोग्य विभागाच्यावतीने शहरातील तीन केंद्रावर लसीकरण करण्यात येत होते. परंतु शिवाजी नगर येथील आरोग्य केंद्र लसीकरण बंद आहे. या आरोग्य केंद्रावर त्वरीत लसीकरण सुरू करून परिसरातील नागरिकांची सोय करावी ही मागणी परळी नगर परिषदेच्या पाणी पुरवठा सभापती उर्मीला गोविंद मुंडे यांनी तालुका आरोग्य विभागाला केली होती. या मागणीची आरोग्य विभागाने दखल घेवून येथील लसीकरण केंद्र सुरू केले आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे, नगर परिषदेचे गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्याकडेही सभापती उर्मीला गोविंद मुंडे यांनी शिवाजीनगर येथील आरोग्य केंद्र जनतेसाठी सुरू करण्याची मागणी केली होती. पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना सूचना केल्याने हे केंद्र तत्काळ सुरू करण्यात आले.
दरम्यान, सभापती उर्मीला मुंडे यांच्या हस्ते लसीकरण मोहीमेची सुरूवात करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लक्ष्मण मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मुंडे, खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन गोविंदराव मुंडे, कल्याण मुंडे, बालाजी चाटे, नरेश मुंडे व इतर आरोग्य विभागाचा स्टाफ उपस्थित होता.