ETV Bharat / state

Beed News: शिवजयंती निमित्ताने युक्रेन रशियातील कलाकारांची कलाकारी; बीडकरांना भुरळ - बीड शहरात शिवजयंती

जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. त्याच दरम्यान गेल्या काही वर्षात बीड शहरात एक वेगळी मेजवानी शिवप्रेमींना मिळते. यामध्ये युक्रेन आणि रशियातील फायर डान्सिंग शो बीडकरांना अनुभवायला मिळाला.

Beed News
शिवजयंती निमित्ताने युक्रेन रशियातील कलाकारांची कलाकारी
author img

By

Published : Feb 20, 2023, 2:09 PM IST

शिवजयंती निमित्ताने युक्रेन रशियातील कलाकारांची कलाकारी

बीड : सध्या युक्रेन आणि रशिया या दोन देशात युद्धाचे सावट आहे. झालेल्या युद्धात दोन्ही देशातील नागरिक मरण पावले. मात्र बीडमध्ये या दोन देशातील कलाकार आमने-सामने आले. बीडकरांचे मनसोक्त मनोरंजन केलेले पाहायला मिळाले. फायर डान्सच्या माध्यमातून आपापल्या देशातील अनोखी कला युक्रेन आणि रशियातील कलावंतांनी दाखवत बीडकरांचे मन जिंकले. बीडकरांनीही त्यांचे भरभरून कौतुक आणि प्रोत्साहन देत उत्साह दाखवला. आमदार संदीप क्षीरसागर यांची सार्वजनिक शिवजयंती ही आता महाराष्ट्रभर प्रचलित होत आहे.

कलाकारांचा थरार : दरवर्षी वेगवेगळ्या माध्यमातून ही शिवजयंती साजरी केली जाते. मात्र गेल्या दोन वर्षात बीडमध्ये वेगवेगळ्या राज्यातील कलावंत आणून त्यांची कलाकारी आस्वादासाठी या शिवजयंतीच्या माध्यमातून मिळते. मात्र यावर्षी नाशिक ढोल, साउथ इंडियन वाद्य, पंजाबमधील कलाकारांची थरार करणारी अनेक कलाकारी, त्याचबरोबर रशिया आणि युक्रेंनचे फायर डान्सिंग कलावंत विशेष आकर्षण ठरले. ही शिवजयंती नागरिकांना लोभनीय आणि आकर्षक करणारी होती.

याविषयी काय म्हणतात आयोजक : छत्रपती शिवाजी महाराज जयंती दहा-पंधरा वर्षांपूर्वी चालू केलेली आहे. बीड शहरात शिवजयंती ही वर्गणीमुक्त केली. त्यानंतर ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळत डॉल्बीमुक्त शिवजयंती साजरी केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे बीड शहरातील माझ्या महिला भगिनी तसेच आम्ही सर्वजण शिवजयंती निमित्ताने एकत्र येऊन ही शिवजयंती साजरी केली आहे. अशी जयंती फक्त बीड शहरामध्येच पाहायला मिळेल. गेल्या वर्षी माझ्या आई, या कार्यक्रमाला होत्या त्या आता हयात नाहीत. तर त्याच वेळेस मी या कार्यक्रमात शब्द दिला होता की, बाहेरील देशातील मी कलाकार बीड शहरवासीयांना नयनदीप्य कार्यक्रम पाहण्यासाठी आणणार आहे. तो शब्द मी आज पाळला. बीड शहरातील महिला भगिनी अबालवृद्धांना पाहण्यासाठी रशिया आणि युक्रेंनचे कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. विशेष म्हणजे मी निवडणुकीच्या माध्यमातून ते शब्द तुम्हाला दिले आहेत ते मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे, असे संदीप क्षीरसागर म्हणाले.

स्वराज्य निर्मितीचा ध्यास : छत्रपती शिवाजी महाराज यांना कधीतरी आपण समजून घेऊ या. 18 पगड जातींना पुढे घेऊन जाणारा छत्रपती शिवाजी महाराज, छोट्यातल्या छोट्या घटकांना हातात तलवार देणारा आणि युद्धावर घेऊन जाणारा आमचा राजा, माय माता भगिनींचा सन्मान करणारा राजा, शेतकऱ्यांचे हित जपणारा आमचा राजा, आयुष्यातील पन्नास वर्ष सतत स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेणारे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या जिजाऊ मासाहेब यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्वराज्य निर्माण करण्यासाठी जे धडे दिले तेच त्यांनी गिरवले. संपूर्ण स्वराज्य निर्माण केलं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे स्वारीवर असायचे, त्या त्यावेळी स्वराज्याचे रक्षण करण्याची जिम्मेदारी मासाहेब जिजाऊंनी घेतली होती. संपूर्ण स्वराज्याचे निर्माण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जिवाजी बाजीपणाला लावून स्वराज्य निर्माण केले.

हेही वाचा : Taj Mahotsav 2023 : ताज महोत्सवाला आजपासून सुरूवात; 'ही' असणार महोत्सवाची थीम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.