बीड - चोऱ्या, घरफोड्या, वाटमाऱ्याचे गुन्हे करून धुमाकूळ घालणाऱ्या दोन कुख्यात आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने बीड व जालना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी (दि.२५) पहाटे या गुन्हेगारांना अटक केली होती.
हेही वाचा - बीड : कोरोना रुग्णांची मृत्यूनंतरही अवहेलना; रुग्णवाहिकेत मृतदेह अक्षरशः कोंबले!
आकाश उर्फ बाबू श्रीराम जाधव (वय २२ रा. शिवाजीनगर, गेवराई) सागर उर्फ दत्ता आनंद बाप्ते (रा. चिंतेश्वर गल्ली, गेवराई) अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांवर
चोऱ्या, घरफोड्या व वाटमाऱ्यांचे गुन्हे नोंद आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांनी कलम ५५ नुसार दोघा आरोपींना बीड व जालना जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार केले होते. २३ एप्रिल २०२१ रोजी भारत राऊत यांनी हे आदेश काढले होते. दरम्यान, रविवारी पहाटे साडेपाच वाजता त्या दोघांना बसस्थानक परिसरातून ताब्यात घेत गेवराई पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भगतसिंग दुल्लत, हवालदार तुळशीराम जगताप, रामदास तांदळे, नरेंद्र बांगर, पो.ना. विकास वाघमारे, सहाय्यक उपनिरीक्षक संजय जायभाये यांनी ही कारवाई केली.
हेही वाचा - जुन्या पिढीतील प्रसिद्ध निर्भिड पत्रकार-संपादक भास्करराव जोशी यांचे निधन