ETV Bharat / state

Beed Accident : ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू - बाबासाहेब गर्जे

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कडा येथे बाजार समितीसमोर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले आहे. बाबासाहेब गर्जे ( वय 47 ), नारायण गोल्हार ( वय वर्ष 51 ) दोघेही राहणार खिळद यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

Beed Accident
Beed Accident
author img

By

Published : Feb 15, 2023, 5:06 PM IST

बीड : आष्टी तालुक्यातील कडा येथे मार्केट कमिटीसमोर एका ट्रकने दुचाकी स्वराला उडवल्याने दुचाकीवर असलेले दोघेजण जागीच ठार झाले आहेत. बाबासाहेब गर्जे ( वय 47 ), नारायण गोल्हार ( वय वर्ष 51 ) दोघेही राहणार खिळद येथील राहणारे आहेत. दोघेही त्यांच्या दुचाकीवरुन कडा येथे काही कामानिमित्त येत होते. त्यांच्या दुचाकीचा क्रमांक MH16 BF 9673 असून त्यांना धामणगावकडून येणाऱ्या भरधाव ट्रकने त्यांना चिरडले.

ट्रकचालकाला बेड्या : ट्रक क्रमांक MH12 EF 3646 ट्रकने त्यांना 200 मीटर पर्यंत लांब फरफटत नेले. तर, त्यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी हा प्रकार पाहिल्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. मात्र, तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. नागरिकांनी त्यांना तात्काळ कडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करत ट्रकचालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

वाहनचालकांवर कारवाई करा : गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरुच आहे. बीड जिल्ह्यात रोज अपघात होत आहेत. हे अपघात होत असताना दुचाकी किंवा चारचाकी वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालतांना दिसत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी भरधाव चालनाऱ्या वाहनावर कारवाई करावी अशी मागणी नाकरिक करीत आहे.

अपघाताला जबाबदार कोण : अनेकवेळा पोलीस प्रशासन दुचाकी, चारचाकी वाहन चालकांना वेग कमी करण्याचे अवाहन करत आहे. तर काही जणांनकडून दंड देखील वसूल करण्यात आला आहे. मात्र, काही वाहनधारक सुसाट वेगाने वाहन चालवत असल्याने अपघातात वाढ होत असल्याचे निदर्शनास पोलिसांचे म्हणणे आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहनधारकांना कमी वेगात वाहन चालवण्याचे अवाहन करीत आहे. मात्र, नागरिक याकडे दुर्लक्ष करत असल्याने अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा - Cheteshwar Pujara Meet PM Modi : चेतेश्वर पुजारा 100 वा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज; मोदींनी केले अभिनंदन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.