ETV Bharat / state

बीडमध्ये विहिरीत आढळले कुजलेले दोन मृतदेह - beed police

एका अरुंद विहिरीत दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने गुरुवारी सकाळी खळबळ उडाली. बीड शहरातील फुलाईनगरातील तावरे मळा येथे ही घटना घडली आहे.

beed police station
बीड शहर पोलीस ठाणे
author img

By

Published : Jan 23, 2020, 3:09 PM IST

बीड - एका अरुंद विहिरीत दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने गुरुवारी सकाळी खळबळ उडाली. बीड शहरातील फुलाईनगरातील तावरे मळा येथे ही घटना घडली आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. अंधार व विहीर अरुंद असल्याने तसेच कठडे नसल्याने दोघेही दुचाकीसह विहिरीत पडले असल्याची माहिती मिळत आहे.

कर्नल हिरासिंग शिकलकर (१९, रा. बस स्थानकाच्या बाजूला, बीड), आकाश श्रीकृष्ण हरनूळ (२० शाहूनगर, बीड) असे मृतदेह सापडलेल्या दोघांची नावे आहेत. शहर पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळाजवळ मारुती वैजीनाथ तावरे (रा. फुलाईनगर, बीड) या नागरिकाने फुलाईनगर परिसरातील एका विहिरीत दोन मृतदेह असल्याची माहिती दिली. त्यानंतर शहर ठाण्याचे निरीक्षक वासुदेव मोरे यांनी कर्मचाऱ्यांसह तेथे धाव घेतली. पोलिसांनी विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्यात दोन मृतदेह असल्याचे आढळून आले. या विहिरीच्या परिसरात शंभर फूट अंतरावर वसाहत असून परिसरात शेती आहे. प्लॉटिंगसाठी खरेदी केलेल्या जागेत ही विहीर असून परिसरात तावरे यांचा मळा म्हणून हा भाग परिचित आहे. विहिरी शेजारी बांधलेले गुरे सोडण्यास गेल्यावर दुर्गंधी आली. शेतकऱ्याने आपली गुरे दुसऱ्या जागेत बांधली आणि विहिरीत डोकावून पाहिले, तेव्हा त्यात दोन प्रेत असल्याचे आढळले. यावेळी स्थानिकांनी मृतदेह पाहण्यासाठी गर्दी केली.

ही माहिती नातेवाईक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांमार्फत शहर पोलिसांना कळविण्यात आली. शहर पोलिसांच्या विनंतीवरून उपस्थानक अधिकारी भागवत धायतिडक हे अग्निशामक दलाचे वाहन व पाच जवानांसह घटनास्थळी पोहोचले व मृतदेह बाहेर काढले. कुजलेल्या स्थितीत सापडलेले मृतदेह विहिरीत केव्हा पडले होते, ते दोघे कुठे चालले होते? याचा तपास बीड शहर पोलीस करत आहेत.

Intro:बीडमध्ये खळबळ: विहिरीत आढळले कुजलेले दोन प्रेत

बीड- एका अरुंद विहिरीत दोन पुरुषांचे मृतदेह आढळून आल्याने गुरुवारी सकाळी खळबळ उडाली. बीड शहरातील फुलाईनगरातील तावरे यांचा मळा येथे ही घटना घडली आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. अंधार व विहीर अरुंद असल्याने तसेच कठडे नसल्याने दोघेही दुचाकीसह विहिरीत पडले.

कर्नल हिरासिंग शिकलकर (१९, रा. बस स्थानकाच्या बाजूला, बीड),
आकाश श्रीकृष्ण हरनुळ, (२० शाहूनगर, बीड) असे मृतदेह सापडलेल्या दोघांची नावे आहेत. शहर पोलिसांच्या माहितीनुसार, घटनास्थळा जवळ मारुती वैजीनाथ तावरे (रा. फुलाईनगर, बीड) या नागरिकाने फुलाईनगर परिसरातील एका विहिरीत दोन प्रेत असल्याची माहिती दिली. त्यानंतर शहर ठाण्याचे निरीक्षक वासुदेव मोरे यांनी कर्मचाऱ्यांसह तेथे धाव घेतली. पोलिसांनी विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्यात दोन प्रेत असल्याचे आढळून आले. या विहिरीच्या परिसरात शंभर फूट अंतरावर वसाहत असून परिसरात शेती आहे. प्लॉटिंगसाठी खरेदी केलेल्या जागेत ही विहीर असून परिसरात तावरे यांचा मळा म्हणून हा भाग परिचित आहे. विहिरी शेजारी बांधलेले गुरे सोडण्यास गेल्यावर दुर्गंधी आली. शेतकऱ्याने आपली गुरे दुसऱ्या जागेत बांधली आणि विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा त्यात दोन प्रेत असल्याचे आढळले. यावेळी स्थानिकांनी मृतदेह पाहण्यासाठी गर्दी केली. ही माहिती नातेवाईक असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यामार्फत शहर पोलिसांना कळविण्यात आली. शहर पोलिसांच्या विनंतीवरुन उपस्थानक अधिकारी भागवत धायतिडक हे अग्निशामक दलाचे वाहन व पाच जवानांसह घटनास्थळी पोहोचले. व मृतदेह बाहेर काढले. कुजलेले कुजलेल्या स्थितीत सापडलेले प्रेत विहिरीत केव्हा पडले होते व ते दोघे कुठे चालले होते. याचा तपास बीड शहर पोलिस करत आहेत जिल्हारुग्णालयात शवविच्छेदन केले आहे.
Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.