ETV Bharat / state

बीड : परळीत वीज कामगार कृती समितीचे 'टुल डाऊन, पेन डाऊन' आंदोलन

आज परळी येथील महावितरण कार्यालयात वीज कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती बांधून 'टुल डाऊन, पेन डाऊन' आंदोलन केले. युवक इंटकचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

tool down pen down agitation by mseb Employees
बीड : परळीत वीज कामगार कृती समितीचे 'टुल डाऊन, पेन डाऊन' आंदोलन
author img

By

Published : May 24, 2021, 4:56 PM IST

परळी वैजनाथ (बीड) - कोरोना काळात वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईनवर्कसचा दर्जा देण्यासह विविध मागण्यांसाठी आज परळी येथील महावितरण कार्यालयात वीज कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती बांधून 'टुल डाऊन, पेन डाऊन' आंदोलन केले. युवक इंटकचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

प्रतिक्रिया

या आहेत मागण्या -

राज्य सरकारकडून व वीज कंपनी व्यवस्थापनाकडून वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, कंत्राटी कामगार, सहाय्यक व प्रशिक्षणार्थी हे महत्त्वाचे घटक असतानासुध्दा यांना कोविड-१९ महामारीच्या काळात फ्रंन्टलाईनवर्करचा दर्जा न देणे, कंपनी कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे तातडीने लसीकरण न करणे, संघटनांसोबत चर्चा न करता महामारीच्या काळात मेडिक्लेमच्या टीपीएमध्ये परस्पर बदल करणे, कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कामगारांच्या वारसांना ५० लाखांऐवजी ३० लाख रुपये सानुग्रह अनुदान देणे व वीजबील वसुलीसाठी कामगारांवर सक्ती न करणे यांसह विविध मागण्यांसाठी महावितरणच्या संयुक्त कृती समितीने आंदोलन केले. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास हे आंदोलन पुढे असे सुरू राहील, असा इशारा युवक इंटकचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय गुट्टे यांनी दिला.

हेही वाचा - नाणार रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यादृष्टीने प्रयत्न केले जातील - नाना पटोले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.