ETV Bharat / state

धक्कादायक! पत्नीसह दोन वर्षाच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या करुन पतीची आत्महत्या - मुलगी-पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या

पत्नी, दोन वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या करुन निर्दयी पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सिरसाळा (ता.परळी) येथील मोहा रोडवर शुक्रवारी रात्री दहा वाजता उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कौटुंबिक कलहातून पतीने हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

Husband killing wife, daughter and commits suicide in beed
मुलगी-पत्नीची हत्या करुन पतीची आत्महत्या
author img

By

Published : Sep 25, 2021, 2:52 PM IST

बीड - पत्नी, दोन वर्षांच्या चिमुकलीची धारदार शस्त्राने हत्या करुन निर्दयी पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सिरसाळा (ता.परळी) येथील मोहा रोडवर शुक्रवारी रात्री दहा वाजता उघडकीस आला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून कौटुंबिक कलहातून पतीने हे पाऊल उचलल्याचा अंदाज आहे.

'सासऱ्याला सांगितले तुम्ही पुढे जा...'

पोलिसांच्या माहितीनुसार, अल्लाहबक्क्ष अहमद शेख (२८), शबनम शेख (२२) व अशफिया (२) अशी मयतांची नावे आहेत. अल्लाहबक्क्ष हा परळी येथील औष्णिक विद्युत केंद्रात वेल्डींगचे काम करायचा. पाथरी (जि.परभणी) येथे २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या नातेवाईकांचा विवाह सोहळा होता. त्यासाठी अल्लाहबक्क्ष याचे सासू-सासरे मुंबईहून येणार होते. दरम्यान, सासऱ्याने फोन करुन सोबत जाऊ असे सांगितले. तेव्हा अल्लाहबक्क्ष याने तुम्ही पुढे जा मी मागून येतो, असे सांगितले. त्यानंतर तो लग्न सोहळ्याला गेलाच नाही. त्याचे भाऊ व शेजारीही या लग्न सोहळ्यास गेले होते. दरम्यान, अल्लाहबक्क्ष व पत्नी शबनम यांच्यात सतत वाद सुरु होते, असे पोलिसांनी सांगितले आहे.

हेही वाचा - सातार्‍यात एकतर्फी प्रेमातून तरूणीची गळा चिरून हत्या, मारेकरी पोलीस ठाण्यात झाला हजर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.