ETV Bharat / state

बीड: खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू; पांगरबावडी येथील घटना - beed latest news

बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात शुक्रवारी सांयकाळी खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली.

Three youth drowned in mine in beed
बीड: खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू; पांगरबावडी येथील घटना
author img

By

Published : Apr 16, 2021, 10:34 PM IST

बीड - पोहण्यासाठी गेलेल्या खदाणीत बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना बीड शहरपासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारात शुक्रवारी सांयकाळच्या सुमारास घडली. ओम गणेश जाधव (१७), श्याम सुंदर देशमुख (१७), मयुर राजेंद्र गायकवाड (१४) सर्व रा. गांधीनगर, बीड अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे आहेत.

पोहता येत नसल्याने बुडून मृत्यू -

ओम, श्याम व मयुर हे तिघे मित्र होते. शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास ते पोहण्यासाठी शहरापासून जवळच असलेल्या पांगरबावडी शिवारातील बायपासनगरी येथील खदाणीकडे गेले होते. तिघांनाही चांगल्या प्रकारे पोहता येत नव्हते. त्यामुळे तिघांचाही खदाणीत बुडून मृत्यू झाला. खदाणीच्या बाहेर त्यांची कपडे, चप्पल व साहित्य होते. याची माहिती मिळताच घटनास्थळी बीड ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. तसेच मृतदेह सापडत नसल्यामुळे अग्नीशमन दलासही पाचारण करण्यात आले होते. अखेर अथक प्रयत्नांनंतर तिघांचे मृतदेह काढण्यात अग्नीशमन दलाला यश आले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मृतकांच्या नातेवाईकांनी धटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणावर आक्रोश केला.

हेही वाचा - नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; ब्रिटनच्या गृहमंत्र्यांनी दिली परवानगी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.