बीड - शहरातील मसरत नगर भागात बुधवारी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर, 27 अहवाल प्रलंबित आहेत. एकूण 130 जणांचे कोरोना चाचणीसाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले होते. यामध्ये शंभर जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील मसरत नगर या भागात एक हैदराबाद येथून प्रवास करून आलेला व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचे स्वॅब कोरोना तपासणीसाठी मंगळवारी अहवाल पाठविले होते. पाठवलेल्या 130 अहवाला पैकी 3 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर, 27 चाचणी अहवाल अद्याप प्रलंबित आहेत. गुरुवारी सायंकाळपर्यंत या 27 जणांचे अहवाल येण्याची शक्यता आहे.
चाचणी अहवाल प्रलंबित राहिल्यामुळे बीडकरांचा चिंतेत वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 52 रुग्ण बरे झालेले आहेत.