बीड - कपडे धुण्यासाठी खाणीवर गेलेल्या दोन मुली व एक मुलगा, असे तीन भावंडांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 8 जून) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास परळी तालुक्यातील दाऊतपूर शिवारात घडली.
रेखा (वय 17 वर्षे) आणि सुरेखा दांडेकर (वय 16 वर्षे) या दोन सख्ख्या बहिणी तर रवींद्र (वय 8 वर्षे) हा चुलत भाऊ असे तिघे जण मिळून दाऊतपूर शिवारातील खाणीत कपडे धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा खाणीत पडून मृत्यू झाला.
परळी तालुक्यातील दाऊतपूर ते औष्णिक विद्युत केंद्र रोडवर खडीमशिनजवळ छोटीशी खाण आहे. या खाणीत पाणी साठलेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तीनही मुले परळी येथील थर्मलमधील कामगारांची आहेत. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून त्या तिन्ही भावंडांचे मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - तरुणांचा तडफडून मृत्यू प्रकरण; तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त, जिल्हा शल्य चिकित्सकांची माहिती