ETV Bharat / state

Bindusara River Pollution : नदीपात्रात दूषित पाणी सोडल्याने हजारो माशांचा मृत्यू - Contamination of Bindusara River MIDC

बीडमधील बिंदुसरा नदीत ( Bindusara river in Beed ) एमआयडीसीचे दूषित पाणी सोडल्यामुळे ( Contamination of Bindusara River MIDC ) नदीपात्रातील हजारो मासे मरण पावल्याची घटना घडली ( Fish die off in Bindusara river ) आहे. तसेच एका श्वानाचा देखील मृत्यू झाला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 4, 2022, 8:28 PM IST

बीड - शहराला वरदान धरलेली बिंदुसरा नदीत ( Bindusara river in Beed ) एमआयडीसीचे दूषित पाणी ( Contamination of Bindusara River MIDC ) सोडल्यामुळे नदीपात्रातील हजारो मासे मरून पडले ( Fish die off in Bindusara river ) आहे. तसेच एका कुत्र्याचाही मृत्यू झालेला आहे. त्याचबरोबर हेच पाणी गावकऱ्यांना पिण्यासाठी विहीर, बोअर, हातपंपाला येत असल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दूषित पाण्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यानिमित्ताने प्रशासन याची दखल घेणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नदीपात्रात दूषित पाणी सोडल्याने हजारो माशांचा मृत्यू

नागरिकांना आरोग्याचा धोका- बिंदुसरा नदीमध्ये दूषित पाणी सोडल्या जात आहे. त्यामुळे नदीपात्रातील माशांचा मृत्यू झाला आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत दूषित पाणी मुरले तर, नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

संबंधितांवर कारवाई करावी - जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी रामदास कदम यांनी केली आहे. आमच्या मागणीची दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असेही ते म्हणाले. प्रदुषणामुळे शेती, जनावरांना पाणी कसे देणार असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. दुषित पाणी पिल्यास जनावरांच्या जीवला धोका निर्माण होवू शकतो अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर - बीडमधील औद्योगिक कारखाण्याचे पाणी बिंदूसरा नदीत सोडले जात आहे. त्याचा पर्यावरणावर घातक परिणाम होतो आहे. दुषित पाण्यामुळे अंगाला खाज येण्याचे प्रमाण वाढत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. दुषित पाण्यामुळे नदिपात्राजवळील गावांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. प्रशासनानी यांची गंभीर दखल घेऊन लवकर प्रश्न निकाली काढावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

परिसरात पाण्याची दुर्गंधी - दुषित पाण्याची आम्ही प्रशासनाला तक्रार केली आहे. मात्र, या प्रकरणी अजूनही कोणीही दखल घेतली नाही असे गोवर्धन कदम यांनी ईटिव्ही भारतशी संवाद साधतांना सांगितले. पाण्याची परिसरात दुर्गंधी पसरली असून श्वास घेणे देखील अवघड झाले आहे. आम्ही काही कारखान्याना याबाबत विचारणा केली असता त्यांनी हातवर केल्याचे ते म्हणाले. जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेवून संबंधित कारखान्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

संबंधितावर कारवाईचा प्रस्तवाव - बिंदुसरा नदीमध्ये साबणाच्या कारखान्याने दूषित पाणी आलेलं आहे, अशा तक्रारी आमच्याकडे ग्रामस्थांनी केलेल्या आहेत. तक्रारीच्या अनुषंगाने प्रदुषण बोर्डाच्या अधिकाऱ्याशी बोलणे झालेले आहे. मी देखील प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन पाहणी करणार आहे, अशी माहिती बीडचे तहसीलदार सुहास हजारे यांनी दिली आहे. संबंधितावर कारवाईचा प्रस्तवाव आम्ही वरिष्ठांकडे पाठवल्याचे तहसीलदार म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.