ETV Bharat / state

शस्त्रक्रियेसाठी काढलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला, बीडच्या चौसाळ्यातील घटना

६० वर्षीय शांताबाई जाधव यांनी बुधवारी चौसाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून ५० हजार रुपये काढले होते. त्यावेळी मुलगी दिपाली चिंतामण जाधव (वय २८ वर्ष) आणि नात त्यांच्यासोबत होती. शांताबाईंच्या हातावर असलेल्या गाठीवर गुरुवारी शस्त्रक्रिया होणार होती. त्यासाठी त्यांनी पैशांची जुळवाजुळव केली होती.

thief
शस्त्रक्रियेसाठी काढलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला
author img

By

Published : Feb 28, 2020, 9:56 AM IST

Updated : Feb 28, 2020, 11:34 AM IST

बीड - महिलेने शस्त्रक्रियेसाठी बँकेतून काढलेले 50 हजार रुपये चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार घडला आहे. बीडच्या चौसाळामध्ये घडलेली ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

शस्त्रक्रियेसाठी काढलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला, बीडच्या चौसाळ्यातील घटना

६० वर्षीय शांताबाई जाधव यांनी बुधवारी चौसाळा येथील स्टेट बँक ऑफ इंडियामधून ५० हजार रुपये काढले होते. त्यावेळी मुलगी दिपाली चिंतामण जाधव (वय २८ वर्ष) आणि नात त्यांच्यासोबत होती. शांताबाईंच्या हातावर असलेल्या गाठीवर गुरुवारी शस्त्रक्रिया होणार होती. त्यासाठी त्यांनी पैशांची जुळवाजुळव केली होती.

हेही वाचा - दिल्लीत हिंसेचा धूर निघत असताना गृहमंत्री कुठे? सेनेचा भाजपला सवाल

शांताबाईंची मुलगी आणि नात मोंढा रोडवरील चौंडेश्वरी जनरल स्टोअर्समध्ये बॅग खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या. त्या ठिकाणी दोन महिला आणि एका मुलगीने गर्दीचा फायदा घेऊन शांताबाई यांच्या पिशवीतील रकमेसह बँक पासबुक, आधार कार्ड आणि पॅनकार्ड लंपास केले. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला आहे. सीसीटीव्ही घटनेच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Last Updated : Feb 28, 2020, 11:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.