ETV Bharat / state

कापूस व्यापाऱ्याला 9 लाखाला गंडा; जीपची काच फोडून लांबवली रक्कम - Bead Police News

या घटनेत लुटारुंनी बोलेरो जीपची काच फोडून 9 लाख 15 हजार रुपयाची रक्कम लंपास केली आहे. बळीराम शंभू खरवडे असे त्या लुट झालेल्या कापूस व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

बीडमध्ये जीपची काच फोडून लांबवली रक्कम
author img

By

Published : Nov 25, 2019, 11:20 PM IST

बीड - गेवराई तालुक्यात एका व्यापाऱ्याला लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत लुटारुंनी बोलेरो जीपची काच फोडून 9 लाख 15 हजार रुपयाची रक्कम लंपास केली आहे. बळीराम शंभू खरवडे असे त्या लुट झालेल्या कापूस व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.

खरवडे यांनी शेतकऱ्यांचा खरेदी केलेला कापूस गेवराई येथील जिनिंगवर विक्री केला होता. यानंतर या कापसाची रक्कम जिनिंग चालकाकडून खरवडे यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात आली होती. या बळीराम खरवडे यांनी सोमवारी गेवराई येथील पुर्णवादी बँकेतून ७ लाख व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून २ लाख १५ हजार असे एकुण ९ लाख १५ हजार रुपयांची रक्कम काढली. यानंतर ही रक्कम स्वतःच्या जीप (क्र.एम.एच.२३ ए.डी.९००१) मधून घेऊन सिरसदेवी कडे निघाले होते. दरम्यान गेवराई पासून जवळच असलेल्या धुळे-सोलापूर या महामार्गावरील प्रदिप जिनिंगसमोच गाडी उभा करुन चालक काशिनाथ पवार व ते जिनिंगमध्ये गेले. या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत गाडीची डाव्या बाजूची काच फोडून आतमधील ९ लाख १५ हजाराची रक्कम पळवली.

हा प्रकार व्यापारी खरवडे व चालक पवार यांच्या जिनिंगच्या बाहेर आल्यानंतर निदर्शनास आला. यानंतर पोलिसांना माहिती कळवताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. एलसीबी, एडीएस यांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी बळीराम खरवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Intro:कापूस व्यापाऱ्याला 9 लाखाला गंडा; जीपचे काच फोडून लांबवली रक्कम

बीड- कापूस व्यापार्‍याच्या बोलेरो जीप मधून नऊ लाख पंधरा हजार रुपयांची रक्कम गाडीचा काच फोडून लांब पावल्याची घटना सोमवारी सायंकाळी सहा वाजता बीड जिल्ह्यातील गेवराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेवराई जवळील प्रदिप जिनिंग समोर घडली.

याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,
बळीराम शंभू खरवडे (रा.सिरसदेवी ता.गेवराई ) यांचा कापूस खरेदीचा व्यापार आहे. खरवडे यांनी शेतकऱ्यांचा खरेदी केलेला कापूस गेवराई येथील जिनिंगवर विक्री केला होता. यानंतर या कापसाची रक्कम जिनिंग चालकाकडून खरवडे यांच्या बचत खात्यावर वर्ग करण्यात आली होती. दरम्यान बळीराम खरवडे यांनी सोमवारी गेवराई येथील पुर्णवादी बँकेतून ७ लाख व स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून २ लाख १५ हजार असे एकुण ९ लाख १५ हजार रुपयांची रक्कम काढली. यानंतर ही रक्कम स्वतःची जीप (क्र.एम.एच.२३ ए.डी.९००१) मधून घेऊन सिरसदेवी कडे निघाले होते. दरम्यान गेवराई पासून जवळच असलेल्या धुळे-सोलापूर या महामार्गावरील प्रदिप जिनिंगसमोच गाडी उभा करुन चालक काशिनाथ पवार व ते जिनिंगमध्ये गेले. या संधीचा चोरट्यांनी फायदा घेत गाडीची डाव्या बाजूची काच फोडून आतमधील ९ लाख १५ हजाराची रक्कम पळवली. हा प्रकार व्यापारी खरवडे व चालक पवार यांच्या जिनिंगच्या बाहेर आल्यानंतर निदर्शनास आला. यानंतर पोलिसांना माहिती कळवताच पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तसेच एलसीबी, एडीएस यांना याप्रकरणी माहिती देण्यात आली आहे. याप्रकरणी बळीराम खरवडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Body:बConclusion:ब
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.