ETV Bharat / state

लाच घेतल्याप्रकरणी भू वैधानिक दोघांना सक्तमजुरीची शिक्षा - भु- वैधानिक अधीकाऱ्याना लाच घेताना अटक

येथील भू वैधानिक कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक प्रकाश पुरी यांच्याकडे रोहतवाडी येथील ग्रामपंचायतीच्यावतीने शिवकालीन पाणी साठवण योजने अंतर्गत बंधारा बांधण्यासाठी मंजूरी देण्यात आली होती. या योजनेचा प्रस्ताव रोहतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने या कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. हे काम अंदाजे १२ लाख रुपयांचे होते

लाच घेतल्याप्रकरणी दोघांना सक्तमजुरीची शिक्षा
author img

By

Published : Nov 16, 2019, 2:55 PM IST

बीड - शिवकालीन पाणी साठवण योजने अंतर्गत ग्रामपंचायतीने दाखल केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यसाठी भू- वैधानिक कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक व आवेदक यांना १५ हजारांची लाच घेताना २०१०मध्ये ताब्यात घेतले होते. या प्रकरणी दोघांनाही जिल्हा सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

येथील भू वैधानिक कार्यालयातील वरिष्ठ सहाय्यक प्रकाश पुरी यांच्याकडे रोहतवाडी येथील ग्रामपंचायतीच्यावतीने शिवकालीन पाणी साठवण योजने अंतर्गत बंधारा बांधण्यासाठी मंजूरी देण्यात आली होती. या योजनेचा प्रस्ताव रोहतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने या कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. हे काम अंदाजे १२ लाख रुपयांचे होते. यामध्ये ४० टक्के रक्कम ही संबंधीत कार्यालयाकडून मिळणार असल्याने ग्रामपंचायतीच्यावतीने या तलावाचे काम पूर्ण करून निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव उपसरपंच पांडुरंग नागरगोजे यांनी भू-वैधानिक कार्यालयाकडे सादर केला होता.

या प्रस्तावास मंजूरी देण्यासाठी या ठिकाणी कार्यरत असलेले वरिष्ठ सहाय्यक प्रकाश पुरी यांनी १५ हजारांची मागणी केली होती. मात्र, लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी २१ सप्टेंबर २०१० मध्ये या लाचेची पडताळणी करून आरोपी प्रकाश पुरी यांच्याकडे पैसे देण्यासाठी गेले असता, याच कार्यालयातील आवेदक बाबासाहेब मनेरी यांच्याकडे ती रक्कम देण्यास सांगितले. मात्र, तक्रारदाराने पैसे तुम्हालाच देणार असे सांगितल्यानंतर काही वेळाने प्रकाश पुरी हे कार्यालयाच्या परिसरात आले. ही रक्कम स्वीकारून ती लगेच बाबासाहेब मनेरी याच्याकडे दिली. याच वेळी लाचलुचपतच्या पथकाने सापळा लावला असता, प्रकाश पुरी घटनास्थळावरून पळून गेला.

बाबासाहेब मनेरी यास ताब्यात घेऊन बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास लाचलुचपतचे आर.टी.रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास झाला. हे प्रकरण प्रमुख सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने पंच गणेश सारूक, डॉ. इरफान शाहा, रामेश्वर रेंगे यांच्या साक्षी घेऊन आरोपी प्रकाश पुरी याला १ वर्षे सक्त मजूरी आणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तर, त्याला सहाय्य करणाऱ्या बाबासाहेब मनेरी याला सहा महिने शिक्षा आणि एक हजारांच्या दंडाची शिक्षा यांनी सुनावली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील मिलींद वाघीरकर यांनी काम पाहिले.

Intro:लाच घेतल्याप्रकरणी दोघांना
सक्तमजुरीची शिक्षा
बीड- शिवकालीन पाणी साठवण योजने अंतर्गत ग्रामपंचायतीने दाखल केलेला प्रस्तावास मंजूरी देण्यासाठी भु-वैधानिक कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक व आवेदक यांना १५ हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने ताब्यात घेतल्याची घटना २०१० मध्ये घडली होती. याप्रकरणी दोघांनाही जिल्हा सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी सक्तमजूरीची शिक्षा सुनावली.

येथील भू वैधानिक कार्यालयातील वरीष्ठ सहाय्यक प्रकाश पुरी यांच्याकडे रोहतवाडी येथील ग्रामपंचायतीच्यावतीने शिवकालीन पणी साठवण योजने अंतर्गत बंधारा बांधण्यासाठी मंजूरी देण्यात आली होती. या योजनेचा प्रस्ताव रोहतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने या कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. हे काम अंदाजे १२ लाख रूपयांचे होते. यामध्ये ४० टक्के रक्कम ही संबंधीत कार्यालयाकडून मिळणार असल्याने ग्रा.प.च्यावतीने या तलावाचे काम पूर्ण करून निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव उपसरपंच पांडुरंग नागरगोजे यांनी भु वैधानिक कार्यालयाकडे सादर केला होता. या प्रस्तावास मंजूरी देण्यासाठी या ठिकाणी कार्यरत असलेले वरीष्ठ सहाय्यक प्रकाश पुरी यांनी १५ हजारांची मागणी केली होती. मात्र लाच देण्याची तक्रारदाराची इच्छा नसल्याने या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी २१ सप्टेंबर २०१० मध्ये या लाचेची पडताळणी करून आरोपी प्रकाश पुरी यांच्याकडे पैसे देण्यासाठी गेले असता याच कार्यालयातील आवेदक बाबासाहेब मनेरी याच्याकडे सदरील रक्कम देण्यास सांगीतले. मात्र तक्रारदाराने पैसे तुम्हालाच देणार असे सांगितल्यानंतर काही वेळाने प्रकाश पुरी हे कार्यालयाच्या परिसरात आले. ही रक्कम स्वीकारून ती लगेच बाबासाहेब मनेरी याच्याकडे दिली. याच वेळी लाचलुचपतच्या पथकाने सापळा लावला असता प्रकाश पुरी घटनास्थळावरून पळून गेला. बाबासाहेब मनेरी यास ताब्यात घेऊन बीड शहर पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास लाचलुचपतचे आर.टी.रेंगे यांच्या मार्गादर्शनाखाली तपास होऊन हे प्रकरण प्रमुख सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी न्यायालयाने पंच गणेश सारूक, डॉ.इरफान शाहा, रामेश्वर रेंगे यांच्या साक्षी घेऊन आरोपी प्रकाश पुरी यास १ वर्षे सक्त मजूरी आणि पाच हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तर त्याला सहाय्य करणाऱ्या बाबासाहेब मनेरी यास सहा महिने शिक्षा आणि एक हजारांच्या दंडाची शिक्षा प्रमुख सत्र न्यायाधीश अंजु शेंडे यांनी सुनावली. याप्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी वकील मिलींद वाघीरकर यांनी काम पाहिले.Body:बीडConclusion:बीड
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.